शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा प्रचारात जात धर्म निघाली नाही -तकी हसन (माजी उपमहापौर)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:02 IST

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यामुळे जनतेत प्रचंड रोष होता. देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले होते. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षाची धुळधाण उडाली. ही निवडणूक मला आठवते.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यामुळे जनतेत प्रचंड रोष होता. देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले होते. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षाची धुळधाण उडाली. ही निवडणूक मला आठवते.इंदिरा गांधी यांचा पराभव करून १९७७ साली मोरारजी देसाई पंतप्रधान बनले. मात्र, त्यांचे खिचडी सरकार अल्पायुषी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. यातच या सरकारचा शेवट १९८० साली झाला. इंदिरा गांधी यांनी पराभवानंतर राष्ट्रीय काँग्रेसऐवजी इंदिरा (आय) काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. आय काँग्रेसकडून काझी सलीम यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात एस काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावकर होते. या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोघेही धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. प्रचारात दोन्ही गटांकडून एकदाही जात, धर्म काढण्यात आला नाही. दोघेही कॉर्नर बैठका घेत प्रचार करीत. छोट्या-छोट्या सभांसह मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावरच भर होता. त्यात कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नव्हता. ही निवडणूक काझी सलीम यांनी जिंकली. डोणगावकरांचा पराभव झाला.१९८४ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तेव्हा राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले अब्दुल अझीम यांना आय काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. एस काँग्रेसकडून पुन्हा साहेबराव पाटील डोणगावकर यांना तिकीट मिळाले. याच निवडणुकीत अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडे यांनी स्थापन केलेल्या दलित मुस्लिम अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ पक्षाकडून राज्यात एकमेव उमेदवार देण्यात आला. या उमेदवाराचे नाव खलील जाहेद, असे होते. राज्यात कोठेही उमेदवार न दिल्यामुळे औरंगाबादेतच कशासाठी उमेदवार दिला, अशी चर्चा तेव्हा केली जात होती. काँग्रेसमधील एका गटानेच मताचे विभाजन होण्यासाठी हाजी मस्तान यांना गळ घातल्याचे त्यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेत सांगितल्याचे आठवते. यात मुस्लिम मताचे विभाजन झाले. साहेबराव पाटील डोणगावकर हेसुद्धा धर्मनिरपेक्ष भूमिका घेणारे होते. मात्र, मुस्लिम मतांमध्ये फूट पडत असताना त्यांनीही हिंदू मते स्वत:कडे वळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. औरंगाबादच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम अशी जात-धर्माच्या नावावर पहिल्यांदाच ही निवडणूक झाली. यात साहेबराव पाटील डोणगावकर यांना विजय मिळाला. मंत्री असताना अब्दुल अझीम यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही ते सत्ता असेपर्यंत मंत्रीपदावर कायम होते.त्यानंतर औरंगाबादेत शिवसेनेचा प्रभाव वाढू लागला होता. मोरेश्वर सावे यांनी एका भागात पाणी कमी येते म्हणून पालिकेच्या उपायुक्तांना काळे फासले. तेव्हा हे प्रकरण शहरासह राज्यभर गाजले. या घटनेनंतर १९८८ साली झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेना पक्षाने हिंदू धर्माच्या नावावर जोरदार मुसंडी मारत ६० पैकी २९ नगरसेवक निवडणूक आणले. काँग्रेस, मुस्लिम लीग आणि आरपीआय या तीन पक्षांचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. यात काँग्रेसचा महापौर बनला. मुस्लिम लीग पक्षाकडून मला उपमहापौर म्हणून संधी मिळाली. त्या निवडणुकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदानाचा बॉक्सच उचलून नेला होता. तेव्हापासून आजपर्यंत हेच हिंदू-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे.-शब्दांकन : राम शिनगारे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक