शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

या परदेशी पाहुण्यांमध्येही झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST

एरवी अधिक प्रमाणात आढळून येणारे रोहित पक्षी, क्राैंच, पट्टेरी हंस, कुरव बदके यावर्षी अगदीच तुरळक आहेत. त्याचप्रमाणे मत्स्य गरुड, ...

एरवी अधिक प्रमाणात आढळून येणारे रोहित पक्षी, क्राैंच, पट्टेरी हंस, कुरव बदके यावर्षी अगदीच तुरळक आहेत. त्याचप्रमाणे मत्स्य गरुड, तपकिरी डोक्याचा माळभिंगरी कुरव, पलाश कुरव, चिखल्या, तुतारी, तुतवार, पाणघार, मलीन बदक, आकाशयोगिनी, लालसरी बदक, थापट्या बदक हे युरोप, सायबेरिया, रशिया, तिबेट या भागांतून येणारे परदेशी पक्षीही बोटावर मोजण्याइतकेच आहेत.

सुकना तलावाच्या आसपास असणाऱ्या झाडीझुडपांमध्ये नीळकंठ, नीलपंखी, वटवट्या, भोरड्या, मैना, अबलक मैना, वेडे राघू, ससाणा यासोबतच रंगीत करकोचा, पाणकावळे, जांभळा सारंग, बगळे, शेकाट्या, शराटी, सुरय हे पक्षी दिसून येत आहेत.

चौकट :

का घटले पक्ष्यांचे आगमन?

पाणवठ्यांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत दरवर्षी घट होत असल्याचे बोलले जाते. मात्र, मागील दोन वर्षांपासून पाणवठे पूर्ण क्षमतेने भरलेले असूनही यावर्षी पक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड. जायकवाडी, सुकना याठिकाणी अवैध मासेमारी, अतिक्रमणे, गाळपेरे असल्याने पक्ष्यांना भक्ष्य पकडण्यासाठी सुरक्षित जागा नाही. सांडपाणी तसेच पाणवठ्यांच्या आसपास केल्या जाणाऱ्या शेतीची घातक रसायने, यामुळे वाढलेले जलप्रदूषणही पक्ष्यांच्या आगमनाला मारक ठरते आहे.

-डॉ. किशोर पाठक, पक्षीतज्ज्ञ

सूचना

पक्ष्यांचे फोटो आहेत