लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यात सहा महसूल मंडळांतर्गत लागवडीयोग्य ६४ हजार ९३०़९० हेक्टरपैकी ५२ हजार २८३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे़ निसर्गाच्या वक्रदृष्टीने अद्याप ३१ हजार ६१७ एकरवर तिफण चालली नसल्याचे २९ जूनच्या अहवालातून समोर आले आहे़कंधार महसूल मंडळांतर्गत १० हजार ११५ हेक्टरपैकी ८ हजार ५३५ हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे़ हे प्रमाण ८४़३८ टक्के होते़ कुरुळा मंडळांतर्गत १२ हजार ३२० हेक्टर पैकी ८ हजार ५९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ हे तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ६९़८० टक्के प्रमाण आहे़ फुलवळ मंडळांतर्गत ११ हजार ७८० हेक्टरपैकी ७९़६९ टक्के पेरणी झाली़ उस्माननगर मंडळांतर्गत ११ हजार ८२२़३० हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ८ हजार ३२५ हेक्टरवर पेरणी झाली़ हे प्रमाण ८३़८१ टक्के आहे़ बारूळ मंडळांतर्गत ९ हजार १६९ हेक्टरवर पेरणी झाली असून हे ८४़८० टक्के आहे़ पेठवडज मंडळांतर्गत ८ हजार २६८ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ हे प्रमाण ८२़९३ टक्के आहे़ तालुक्यात ८०़५२ टक्केच खरीप पेरणी झाली आहे़तालुक्यात मोठ्या उत्साहाने कापूस लागवड १८ हजार ४३३ हेक्टरवर सर्वाधिक आहे़ सोयाबीन १६ हजार २५० हेक्टर, ज्वारी ११ हजार ३७० हेक्टर, तूर ३ हजार २५०, उडीद १ हजार ४५०, मूग १ हजार २०० हेक्टर आदींची पेरणी केली आहे़ पावसाची वाणवा झाल्याने पिके धोक्यात आली आहेत़ त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे़ पिकांना तारण्यासाठी मोठी कसरतीचे तगडे आव्हान आहे़पिकांना जीवदानलोकमत न्यूज नेटवर्कनिवघा बा. : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निवघा बा़ परिसरात सोमवारी सायंकाळी साधारण अर्धा तास चांगला पाऊस बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे़ ज्याच्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती, अशा शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला आहे़ तर काही शेतकरी पिकात चुका झाल्या त्या चुका लावत आहेत.
३१ हजार एकरावर कंधारात तिफण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 00:19 IST