शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

११६ गावांत स्मशानभूमीच नाही !

By admin | Updated: February 15, 2016 00:17 IST

लातूर : स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते, संरक्षण भिंत व वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्याची योजना आहे. मात्र जिल्ह्यातील ११६ गावांत स्मशानभूमीला जागाच नाही

लातूर : स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते, संरक्षण भिंत व वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्याची योजना आहे. मात्र जिल्ह्यातील ११६ गावांत स्मशानभूमीला जागाच नाही. गायरान अथवा जमीन संपादित करून ती स्मशानभूमीला देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.लातूर जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायती आहेत. तर गावांची संख्या ९०० च्या पुढे आहे. त्यातील ११६ गावांमध्ये कोणत्याही समाजाची स्मशानभूमीच नाही. स्मशानभूमीला जागाही नाही. जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील तहसीलदार व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्मशानभूमी नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला आहे. लातूर तालुक्यातील १५, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १२, औसा तालुका २३, निलंगा ५, रेणापूर १५, अहमदपूर ३५, चाकूर १, देवणी, २, उदगीर ६, जळकोट २ अशा एकूण ११६ गावांमध्ये स्मशानभूमी नाही. पारंपरिक जागेत अंत्यसंस्कार केले जात असले, तरी संबंधित जागेसंदर्भात सातबारा अथवा गाव नमुना ८ अ आदी कागदपत्रे स्मशानभूमीच्या नावे नाहीत. स्मशानभूमीची जागाच नसल्यामुळे या कागदपत्रांचा अभाव आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या गावांत स्मशानभूमीला जागा नाही, त्या गावांत गायरान जमीन देणे अथवा गायरान जमीन नसेल, तर भूसंपादन करून स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. प्राधान्याने या ११६ गावांच्या संदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी संबंधितांना दिले आहेत. (प्रतिनिधी)