शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात काम करीत असताना गुणवत्तेशी तडजोड नाही : कुलगुरू येवले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:41 IST

डॉ. येवले यांनी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला

ठळक मुद्देशिस्तीला प्राधान्य देणार पीएच.डी. विभागाकडे देणार सर्वाधिक लक्ष

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्य करताना शिस्त आणि पदभरतीला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल. काम करीत असताना गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही, असे प्रतिपादन नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. 

विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून मंगळवारी (दि.१६) सकाळी डॉ. येवले यांनी राजदंड घेत स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे महात्मा फुले सभागृहात नवीन कुलगुरूंचे स्वागत आणि अतिरिक्त पदभार असलेले कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. येवले म्हणाले की, प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विद्यापीठाची प्रगती आणि नावलौकिक उंचाविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रश्न जवळपास सारखेच आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मेहनत करण्याची प्रचंड क्षमता असते. त्या विद्यार्थ्यांना योग्य त्याठिकाणी संधी उपलब्घ करून देण्याचे कार्य विद्यापीठाला करावे लागणार आहे. राज्यपाल तथा कुलपतींनी सोपवलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. राजेश करपे, डॉ. राहुल मस्के, कुलसचिव डॉ. साधना पांडे, ज्योती येवले, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, परीक्षा मंडळ संचालक डॉ. गणेश मंझा यांच्यासह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. येवले यांचा प्रशासनातर्फे कुलसचिव डॉ. साधना पांडे, प्राध्यापकांच्या ‘बामुटा’ संघटनेतर्फे डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. राम चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. कैलास पाथ्रीकर, पर्वत कासुरे यांनी सत्कार केला. 

पीएच.डी. विभागाकडे देणार सर्वाधिक लक्षविद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र असले पाहिजे. विद्यापीठ पीएच.डी.चे संशोधन करीत असताना सामाजिक उपयोगिता, विभाग व राष्ट्राची गरज आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व प्राधान्याने लक्षात घेतले पाहिजे. हा विभाग सक्षम असेल, तर विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडेल. याशिवाय परीक्षा विभागही गतिमान असला पाहिजे. परीक्षा झाल्यानंतर अल्प वेळात निकाल जाहीर करण्याकडे अधिक लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

खूप शिकायला मिळाले : शिंदेविद्यापीठाच्या अतिरिक्त कुलगुरुपदाच्या दीड महिन्याच्या कार्यकाळात अनेक  गोष्टी शिकता आल्या. या काळात अनेकांचे सहकार्य मिळाले, असे मावळते कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले. ज्या विद्यापीठात शिकलो त्या विद्यापीठाचे सर्वोच्चपद मिळणे हा माझा सन्मान होता, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ