शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतप्त, कुलगुरूंविरोधात मांडणार हक्कभंग

By बापू सोळुंके | Updated: September 16, 2022 10:48 IST

Ambadas Danve: डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रम  पत्रिकेत नाव नसल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षानेते अंबादास दानवे संतप्त झाले आहे

- बापू सोळुंकेऔरंगाबाद: डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रम  पत्रिकेत नाव नसल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षानेते अंबादास दानवे संतप्त झाले आहे. कुलगुरू येवले यांच्या विरोधात कायदेशीर मार्गा हक्कभंग दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शुक्रवारी सायंकाळी या पुतळ्याचा अनावरण  समारंभ होत आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मात्र विधानपरिषदेचे विरोधीपक्षानेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव नाही. विद्यापीठ प्रशासनाच्या या कृतीमुळे दानवे हे संतप्त झाले आहेत. या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाने त्यांना रीतसर   निमंत्रण दिले आहे. असे असले तरी दानवे यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. आणि आज सकाळी ते बुलढाणा च्या नियोजित दौऱ्यावर निघाले. याविषयी बोलताना दानवे म्हणाले की माझे नाव  पत्रिकेत टाकू नये असे कुलगुरू ला कुणीतरी सांगितले असेल. मात्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संविधानिक पदावरील खासदार, आमदार यांची नावे पत्रिकेत टाकणे गरजेचे होते. मुद्दामहून नाव न टाकल्याने आपण कुलगुरु विरोधात कायदेशीर पद्धतीने विधानपरिषदे अध्यक्षांकडे  हक्कभंग दाखल करणार आहे. आज त्या कार्यक्रम ला जाणार नाही.शिवसैनिकासोबत जाईलआज जरी मी पुतळा अनावरण समारंभाला जाणार नसलो तरी छत्रपती आमचे दैवत आहे. यामुळे नंतर शिवसैनिकांना सोबत घेऊन जाईन आणि अभिवादन करणार आहे.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण