शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

साहित्यिकांना भूमिकेला बांधील राहण्याजोगे वातावरण सध्या देशात आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद : लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी लेखक, साहित्यिक, विचारवंत यांची भूमिका महत्त्वाची असते. सध्या या भूमिकेला बांधील राहण्याजोगे वातावरण ...

औरंगाबाद : लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी लेखक, साहित्यिक, विचारवंत यांची भूमिका महत्त्वाची असते. सध्या या भूमिकेला बांधील राहण्याजोगे वातावरण सध्या देशात आहे का, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी येथे ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी उपस्थित केला.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार, मावळते अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, आ. सतीश चव्हाण, 'मसाप'च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामुपरे, डॉ. चेतना सोनकांबळे, मसापचे उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, राधाबाई बिरादार यांची मंचावर उपस्थिती होती.

उद्घाटक म्हणून बोलताना चव्हाण म्हणाले, साहित्यावर अधिकार वाणीने बोलण्याचा अधिकार नाही, मात्र साहित्य चळवळ रुजली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी राजकीय व्यक्तींनी सहकार्य केले पाहिजे. मराठवाड्याचा सर्व विभागात अनुशेष आहे, मात्र साहित्यात मराठवाडा पुढारलेला आहे.

राज्याचे पहिले सांस्कृतिक धोरण जाहीर करण्याचा योग माझ्याच कार्यकाळात आला. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा साहित्य, कला, संस्कृती याविषयी आस्था बाळगून आहेत. त्यामुळे सर्वांनी सोबत घेऊन साहित्य चळवळीचे प्रश्न सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष डॉ. करपे यांनी लोकसंवाद फाऊंडेशनची निर्मिती, राबविण्यात येणारे उपक्रम आणि मराठवाड्याच्या सांस्कृतिक इतिहासाचा आढावा घेतला. प्रास्ताविकात डॉ. चव्हाण यांनी अवघ्या २५ दिवसात हे साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य उचलले असल्याचे सांगितले. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात मराठवाडा गीताने झाली. यावेळी गोंदण विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले. आभार संकेत कुलकर्णी यांनी मानले.

चौकट,

तो शब्द आणि हा शब्द...

ठाले पाटील म्हणाले, 'मसाप'चा जन्म नांदेड शहरात झाला. आजवर ही संस्था विस्तारली. पण, जन्मभूमी असलेल्या नांदेडमध्ये हक्काचे कार्यालय अजून झाले नाही. याविषयी अशोकरावांना पाच वर्षांपूर्वी पत्र दिले, तेव्हा ते 'करतो' म्हणाले. पण, आज पाच वर्षे झाली, अजूनही आम्हाला जागा मिळाली नाही. २००१ च्या मराठवाडा साहित्य संमेलनात दिवंगत नेते विलासराव देशमुख आले होते. तेव्हा फक्त भिंती उभ्या होत्या, पंखे नव्हते. घामाने आणि माझ्या भाषणाने विलासराव घामाघूम झाले. या संस्थेला काहीतरी अनुदान द्या, ही माझी मागणी होती. सध्या जशा बारा आमदारांच्या नियुक्त्या अडवून ठेवलेल्या आहेत, तसे बारा आमदार तेव्हा निवडून आले होते. त्यांच्या माध्यमातून विलासरावांनी तसेच शरद पवार, जयंत पाटील या नेत्यांनी या संस्थेच्या विकासाला हातभार लावला. यावेळी १२ आमदारांचा मुद्दा काढताच सभागृह खळखळून हसले.

ठाले पाटील इतके दिवस अध्यक्ष कसे?

ठाले पाटील यांच्या वक्तव्याची अशोकराव चव्हाण यांनीही फिरकी घेतली. आम्हाला मंत्रिमंडळात २० वर्षे टिकून राहणे शक्य होत नाही; मग ठाले पाटील २० वर्षांपासून मसापचे अध्यक्ष कसे राहिले, याचे मला आश्चर्य वाटते. ठाले पाटलांच्या भाषणानेच तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना घाम आला असेल, पण मला नाही आला. मी तुमच्या मागण्यांचा विचार करतो. सहा महिन्यांत नांदेडमध्ये मसापच्या कार्यालयाला जागा देऊ, असा शब्द यावेळी अशोकराव चव्हाणांनी दिला.

चौकट...

नाट्यसंमेलन घेणे सोपे, साहित्य संमेलन अवघड

कोरोनाच्या काळात सगळीकडेच अंधकार पसरलेला असताना औरंगाबादेत साहित्य संमेलन होत आहे ही आनंदाची बाब आहे. मानापमानामुळे एकवेळ नाट्यसंमेलन घेणे सोपे जाईल, पण साहित्य संमेलन घेणे अवघड असते, याची प्रचिती आयोजकांना आलेली असेल, अशी कोपरखळी चव्हाण यांनी यावेळी मारली.