शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

‘पदवीधर’साठी अडीच हजार मतदार

By admin | Updated: May 26, 2014 00:57 IST

अतुल शहाणे, पूर्णा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता लागू झाली़

अतुल शहाणे, पूर्णा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता लागू झाली़ २० जून रोजी होणार्‍या या मतदान प्रक्रियेत तालुक्यातील २ हजार ४७१ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेस २७ मेपासून सुरुवात होणार आहे़ तालुक्यात या निवडणुकीसाठी ताडकळस, चुडावा, कात्नेश्वर व पूर्णा हे चार केंद्र असणार आहेत़ ताडकळस येथील केंद्रावर २४४ पदवीधर मतदार आहेत़ त्यात २२६ पुरुष आणि १८ महिलांचा समावेश आहे़ चुडावा येथील ३६४ मतदारांमध्ये ३४१ पुरुष व २३ महिला, कात्नेश्वर येथील २२० मतदारांत २११ पुरुष व ९ महिला तर पूर्णा येथे १ हजार ६४३ मतदारांमध्ये १ हजार ४२८ पुरुष आणि २१५ महिला पदवीधर मतदारांचा समावेश आहे़ गतवर्षीपेक्षा यावर्षी पदवीधर मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली़ मागील मतदार यादीत पूर्णा शहरात १ हजार २४० मतदार होते़ यावेळी ४४४ नवीन मतदारांची नोंदणी झाली़ तसेच यातून ४१ मतदारांची नावे वगळली आहेत़ ताडकळस मतदान केंद्रांतर्गत पूर्वी १५० मतदार होते़ वाढीव मतदारांमध्ये ९५ मतदार वाढले तर १ मतदार वगळण्यात आला़ चुडावा मतदार यादीत २२९ मतदार होते़ त्यात १४० मतदारांची वाढ झाली तर ५ मतदार वगळण्यात आले़ कात्नेश्वर केंद्रांतर्गत ११८ मतदार होते़ वाढीव मतदारांमध्ये १०४ मतदारांनी नोंदणी केली तर २ मतदार या केंद्रातून वगळले आहेत़ लोकसभा निवडणुकीनंतर लगेच लागलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे राज्यभरातील शिक्षकांच्या बदली प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ पदवीधर मतदारसंघासाठी ३ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून, ४ जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे़ या मतदारसंघासाठी अद्याप कोणत्याही उमेदवाराची नावे चर्चेत नसली तरी सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तयारीला लागले आहेत़