शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 19:44 IST

शहरातील कोविड रुग्णालय, क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या होत्या.

ठळक मुद्देअधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल कराविनाकारण अधिकाऱ्यांवर कारवाईचा फार्स करू नका

औरंगाबाद : कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाने मला ऑक्सिजनची गरज आहे, तो उपलब्ध करून दिला जात नाही, माझा मृत्यू झाला तर त्याला रुग्णालय जबाबदार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्या व्हिडिओची दखल घेतली. हा व्हिडिओ खंडपीठांतर्गत जिल्ह्यातील असून, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्य सरकारी वकिलांकडे केली. त्या अधिकाऱ्यांना नोटिसा देऊ नका, वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांनी दिले.

शहरातील कोविड रुग्णालय, क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्या वृत्तांची खंडपीठाने दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली. यावर वेळोवेळी सुनावणी होऊन वेगवेगळे निर्देश दिले आहेत. या फौजदारी जनहित याचिकेवर ४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र, न्या.टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम.जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजताच मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे आणि अमिकस क्यूरी ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांना कोविड फौजदारी जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कळविले. सुरुवातीला खंडपीठाने औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त डॉ. आस्तिककुमार पाण्डेय यांनी अँटिजन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्य होता असे म्हणत आयुक्तांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या मदतीला महसूल आणि पोलीसदेखील उत्तम काम करीत असल्याचे म्हटले आहे.

न्या. टी. व्ही. नलावडे हे स्वत: न्यायालयीन कामकाजासंदर्भात जालना येथे गेले होते, त्यावेळी त्यांनी जिल्ह्याबाहेर पडण्याची परवानगी घेतली होती. जाताना नाक्यावर अडविले. त्यावेळी त्यांना पास आहे का? अशी विचारणा केली, तो न पाहता जाण्यास सांगितले.  सायंकाळी परत येताना मात्र कोणी चौकशी केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात रुग्णाने आॅक्सिजन मिळत नाही, मला आॅक्सिजनची गरज असून, असा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओची खंडपीठाने दखल घेतली असून, व्हिडिओ तयार करणारा रुग्ण दुसऱ्या दिवशी मरण पावला आहे. त्यामुळे त्या जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा खंडपीठाने मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांच्याकडे केली आहे. 

कारवाईचा फार्स नकोअधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश खंडपीठाने देत विनाकारण अधिकाऱ्यांवर कारवाईचा फार्स करू नका, आपण खंडपीठात फौजदारी जनहित याचिका चालवीत आहोत, असे नमूद केले. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल