वडीगोद्री : अंबड तालुक्यातील शहापूर येथे बेवारस सापडलेली औषधी चोरीची असून, या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूरजवळ सोमवारी सकाळी साडेसात लाख रूपये किंमतीचा विविध औषधींचा साठा आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता एका मेडिकल एजन्सीच्या चालकास मारहाण करून औषधी पळविण्यात आल्याचे पुढे आले. सदर औषधींची किंमत ७० लाख रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर घटनेचा तपास करण्यासाठी इंदापूर पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याचे गोंदी पोलिसांनी सांगितले. एकूणच या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. (वार्ताहर)
शहापूरजवळ सापडलेली औषधी चोरीची...!
By admin | Updated: December 28, 2016 00:06 IST