लातूर : शहरातील गंजगोलाई भागातील जय जगदंबा देवीच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याच्या दागिण्यांची चोरी लातूर सासरवाडी असलेल्या एका जावयाने केल्याचे उघडकीस आले आहे. गांधी चौक पोलिसांनी महाराणा प्रताप नगर येथे जाऊन गुरुवारी त्याच्या मुसक्याही बांधल्या आहेत. शहरातील गंजगोलाई भागातील मनपाच्या गाळा क्रमांक ६५ मधील जगदंबा लॉटरी सेंटरचे मालक गेल्या बुधवारी दुकान बंद करून गेले असता अज्ञात चोरट्याने दुकानाच्या वरच्या बाजूने असलेल्या सिमेंटची जाळी तोडून जगदंबा देवीच्या गळ्यातील पाच तोळे दागिन्याची चोरी करून पोबारा केला़ या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी तपासाला गती दिली असून गुरूवारी या चोरी प्रकरणी जलील बशीर शेख (वय २७, रा़महाराणा प्रतापनगर) याला राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
सासरवाडीतील मंदिरात जावयाची चोरी !
By admin | Updated: January 2, 2015 00:45 IST