शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा ‘युवक महोत्सव’ जिल्हानिहाय होणार; तर स्वतंत्र लोककला महोत्सवाचे देखील आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:20 IST

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतील ‘लोककला महोत्सव’ही यंदापासून स्वतंत्रपणे घेण्यास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून चारही जिल्ह्यांत स्वतंत्रपणे ‘युवक महोत्सव’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच वेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतील ‘लोककला महोत्सव’ही यंदापासून स्वतंत्रपणे घेण्यास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. बैठकीस प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह १९ सदस्य उपस्थित होते. बैठकीत २४ प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय युवा महोत्सव सल्लागार समितीच्या सूचना मान्य करण्यात आल्या आहेत. त्यात प्रत्येक संलग्नित महाविद्यालयांना किमान दोन कलाप्रकारांत सहभागी होण्याबाबत बंधनकारक करण्यात येणार आहे. केंद्रीय लोककला युवा महोत्सव स्वतंत्र आणि युवा महोत्सव जिल्हानिहाय घेण्याबाबत मान्यता देण्यात आली. केंद्रीय लोककला महोत्सव नामविस्तार दिनाच्या पूर्वी घेण्यात येणार आहे. त्याशिवाय साई सकल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, चिकलठाण, (ता. कन्नड) हे महाविद्यालय आसावा ब्रदर्स संस्थेकडे हस्तांतरण करण्यासाठी प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेत समिती स्थापना केली. मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या महाविद्यालयाचे नाव बदलून मातोश्री श्रीकंवर महाविद्यालय असे करण्यास मंजुरी दिली. या बैठकीत चार समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुलगुरूंच्या अभिनंदनाचा ठरावकुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी वार्षिक परीक्षेच्या काळात अनेक परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. योग्य त्या सूचना केल्या. त्याचा आगामी काळात परीक्षेत पारदर्शकता होण्यास मदत होणार आहे. याबद्दल कुलगुरूंच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेची ‘कर्नल कमांडंट’ ही उपाधी जाहीर झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. दोन्ही प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र