शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

विनाकळसाचे अनोखे शिवमंदिर, गाभऱ्यातच नंदी; १०४४ नॅनो आरशांतून होते केशरीनाथांचे दर्शन

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 7, 2023 16:03 IST

गाभाऱ्यात शिवलिंगाच्या अवतीभोवती चारी भिंतीवर नॅनो आरसे बसविण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरात अतिप्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकीच एक केशरसिंगपुऱ्यातील केशरीनाथ शिव मंदिर होय. हे मंदिर सुमारे ३५० वर्ष जुने आहे. आणि गाभाऱ्यात चोहीबाजूने बसविलेल्या १०४४ नॅनो आरशात प्रतिबिंब दिसते. ३५० वर्षांपूर्वी राजा केशरसिंग यांचे या परिसरात वास्तव्य होते. त्यांच्याच नावाने म्हणजे केशरसिंगपुरा आजही ओळखला जातो. राजा महादेवाचा भक्त होता. त्यानेच हे मंदिर उभारले, असे सांगितले जाते.

गाभारा जमिनीपासून ८ फूट खोलया मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग हे जमिनीपासून ८ फूट खोल आहे. एक खोलीतून पायऱ्या उतरून तिसऱ्या खोलीत म्हणजे गाभाऱ्यात जाता येते. बाहेरूनही शिवलिंगाचे दर्शन होते.

सुंदर नक्षीकाम केलेली दगडाची चौकटमंदिराच्या गाभाऱ्यात जाताना एक सुंदर नक्षीकाम केलेली दरवाजाची चौकट लक्ष वेधून घेते. या चौकटीला सोनेरी रंग देण्यात आला आहे.

गाभाऱ्यात काचकामगाभाऱ्यात ३५० वर्ष जुने शिवलिंग आहे. ते ५ बाय २ फुटाचे शिवलिंग आहे. मूळ पाषाणाच्या या पिंडीवर तांब्याचे कवच चढविण्यात आले आहे. गाभारा थंड राहावा म्हणून २०१२ मध्ये या गाभाऱ्यात काचकाम करण्यात आले. काचेमध्ये पारा असतो. यामुळे गाभाऱ्यात थंडावा निर्माण होण्यास ते पूरक ठरतात. काही आरशाचा पारा निघाला आहे.

नॅनो आरशातून शिवलिंगाचे सहस्त्रदर्शनगाभाऱ्यात शिवलिंगाच्या अवतीभोवती चारी भिंतीवर नॅनो आरसे बसविण्यात आले. यात प्रत्येक कोपऱ्यात २०१ आरसे, असे ८०४ आरसे व दक्षिण व उत्तर बाजूच्या भिंतीवर दोन्ही बाजूस मिळून २४० आरशाची चौकट तयार करण्यात आली आहे. एकूण १०४४ आरशांमधून महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. हे पाहून भाविक भारावून जातात.

गाभाऱ्यातच नंदीकेशरीनाथ शिव मंदिराला कलश नाही. इतर महादेव मंदिराबाहेर नंदीचे स्थान असते; पण केशरीनाथ शिवलिंगच्या बाजूलाच नंदी विराजमान आहे. पुजारी डोलारे यांनी सांगितले जाते की, ३५० वर्षांपूर्वी परकीयांच्या हल्ल्यापासून मंदिराला वाचविण्यासाठी कळश चढविण्यात आला नाही. तसेच नंदीलाही गाभाऱ्यात ठेवण्यात आले. यामुळे येथे मंदिर आहे, हेच बाहेरून कोणाला कळत नव्हते. यामुळे मंदिराचे रक्षण झाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक