शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नवीन तांदूळ येण्याआधीच भाताची चव ‘बिघडली’; जुन्या तांदळाच्या किमतीत वाढ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 1, 2023 14:37 IST

तांदळाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने, नवीन तांदळाचे भाव वधारलेले असतील.

छत्रपती संभाजीनगर : नवीन तांदळाची चाहूल लागते, तेव्हा जुन्या तांदळाचे भाव कमी होत असतात, पण यंदा चक्र उलटे फिरले आहे. तांदळाचा नवीन हंगाम सुरू होतानाच, दुसरीकडे जुन्या तांदळाचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी जुन्या तांदळाच्या भाताची चव बिघडली आहे.

कोणत्या तांदळाचे वाढले भाव?तेलंगणातून येणाऱ्या कोलम तांदळाचे भाव क्विंटलमागे २ हजार ते अडीच हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या ६० ते ६४ रुपये किलो दर आहे, तसेच बासमतीच्या तांदळातही मोठी वाढ झाली आहे. बासमती क्विंटलमागे ७०० रुपयांनी वधारून सध्या ९० ते १४० रुपये किलोदरम्यान विकला जात आहे.

का वाढले भाव?यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने महिनाभर उशिराने पेरणी झाली. यामुळे नवीन तांदळाचा हंगाम महिनाभर उशिराने होत आहे. यात कर्नाटक राज्यात तांदळाचे उत्पादन कमी असल्याचे सांगितले जात आहे.

कधी येणार नवीन तांदूळ?डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेनंतर नवीन तांदळाची आवक वाढेल. जानेवारीत सर्व प्रकारचा नवीन तांदूळ उपलब्ध होईल.

नवीन तांदळाचे भाव काय असतील?तांदळाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने, नवीन तांदळाचे भाव वधारलेले असतील. डिसेंबर महिन्यात नवीन तांदळाच्या भावातील तेजी-मंदी लक्षात येईल.

तेलंगणातून थोडीशी आवक सुरूतेलंगणातून नवीन कोलम तांदळाची थोडीशी आवक सुरू झाली आहे. विदर्भात तांदळाचे उत्पादन समाधानकारक आहे.

बासमती खाण्यासाठी ठेवा खिसा गरमदरवर्षी देशात सरासरी १०० लाख टनांपेक्षा अधिक बासमती तांदळाचे उत्पादन होत असते. मात्र, यंदा जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली. यामुळे बासमती तांदळाचे उत्पादन ८ ते १० लाखांनी घटण्याची शक्यता तांदळाचे कमिशन एजंट व्यक्त करीत आहेत. परिणामी, बासमतीचे भाव वाढतील व नवीन बासमती तांदूळ खरेदीसाठी खवैय्यांना खिसा गरम ठेवावा लागणार आहे.- टिंकू खटोड, तांदळाचे व्यापारी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्नAgriculture Sectorशेती क्षेत्र