शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

रब्बी हंगाम संपत आला; पीककर्ज कधी मिळणार ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 28, 2024 11:35 IST

रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल.

छत्रपती संभाजीनगर : नवीन गहू, ज्वारीचे अडत बाजारात आगमन झाले आहे. सुरुवातीला आवक कमी असली तरी पुढील महिन्यात आवकमध्ये मोठी वाढ होईल. रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल. दुसरीकडे अजूनही अनेक शेतकरी असे आहेत की, त्यांना पीक कर्जाची रक्कम मिळाली नाही, अजूनही प्रतीक्षा सुरू आहे.

रब्बीची १०७ टक्के पेरणीपावसाळ्यातील शेवटच्या टप्प्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पेरणीला वेग आला होता. छत्रपती सरासरी पेरणी क्षेत्र १३६८३० हेक्टर आहे. त्यापैकी प्रत्यक्ष पेरणी १४६५८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण १०७.३ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

उद्दिष्ट ८११ कोटींचे, वाटप केवळ २५० कोटीरब्बी हंगामात बँकांना ११६००० शेतकऱ्यांना ८११ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यापैकी फक्त २६ हजार शेतकऱ्यांना २५० कोटींचे पीककर्ज वाटप झाले. ६१ टक्केच उद्दिष्ट बँकांना पूर्ण करण्यात यश आले.

कोणत्या बँकेला किती उद्दिष्ट देण्यात आले होते.बँक             सभासद कर्जराष्ट्रीयीकृत बँका ४०८०० ३२७ कोटीखाजगी बँका ११८०० ८४ कोटीजिल्हा बँक ५०००० २९७ कोटीग्रामीण बँक १३४००            १०३ कोटी

कोणत्या बँकांनी प्रत्यक्षात किती पीककर्ज वाटप केलेबँक सभासद कर्जवाटपराष्ट्रीयीकृत बँक १६००० १३७ कोटीखाजगी बँक १४७२ ४७ कोटीजिल्हा बँक : ५००० २१ कोटीग्रामीण बँक : १२२१ १२ कोटी

त्यामुळे नवीन पीक कर्ज वाटप कमीआतापर्यंत १.७८ लाख शेतकऱ्यांनी १९०० कोटी रुपयांची पीककर्जाची परतफेड केली नाही. यामुळे बँकांना पीक कर्ज वाटपात उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. वार्षिक आधारावर केवळ ५ ते ८ टक्के शेतकरी आहेत जे पीक कर्जासाठी अर्ज करतात. जोपर्यंत विद्यमान शेतकरी त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नाहीत तोपर्यंत पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे बँकांना अशक्य आहे.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrop Loanपीक कर्ज