शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अहो चक्क प्राध्यापकच फसले! मोबाईल नंबरच्या केवायसीसाठी ॲप घेतले अन सव्वा लाख गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 19:03 IST

मोबाईल नंबर बंद होईल असा मेसेज येऊन अनोळखी नंबरवरून आला फोन

केज ( बीड ) : मोबाईल नंबरच्या ई-केवायसीसाठी प्राध्यापकाने एक ॲप डाऊनलोड केल्यानंतर काही वेळातच १ लाख ३९ हजार खात्यातून लंपास झाल्याची घटना २० फेब्रुवारीस शहरात घडली. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. 

केज येथील समर्थ नगर भागात राहत असलेले शकील बशीर तांबोळी हे पुणे येथे एका कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वा ८९२१०५८४४५ या अनोळखी नंबर वरून फोन आला. त्याने सांगीतले की, तुमची मोबाईल सेवा चालू ठेवण्यासाठी प्ले स्टोअर्स मधून एक ॲप डाउनलोड करा व नंतर १० रु. चे रिचार्ज करा. तांबोळी यांनी मोबाईल नंबर बंद होईल याच्या भीतीने सांगितल्याप्रमाणे ॲप डाउनलोड केले. 

मात्र, त्यानंतर तांबोळी यांच्या बँक खात्यातून पहिल्यांदा २५ हजार, दुसऱ्यांदा ४९ हजार ३५० आणि तिसऱ्या वेळी ६५ हजार रु. असे एकूण १ लाख ३९ हजार ३६५ रुपये लंपास झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रा. शकील बशीर तांबोळी यांनी दि. २१ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीBeedबीड