शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात करून मातृत्वाचा आनंदही; धोका पत्करून डाॅक्टर करत आहेत सुरक्षित प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 18:03 IST

corona virus तिसऱ्या लाटेतही गरोदरमाता पाॅझिटिव्ह आढळून येत आहेत

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना म्हटले की सर्वसामान्य नागरिक एकमेकांपासून दूर पळतात. परंतु डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी गेल्या दोन वर्षांपासून अहोरात्र झटत आहेत. एवढेच नाही तर कोरोनाशी दोन हात करीत गरोदर मातांना मातृत्वाचा आनंदही देत आहेत. कारण गरोदर मातांनाही कोरोना गाठत आहे. पहिला, दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेतही गुंतागुंत, आव्हान ठरणारी कोरोनाबाधित गरोदर मातांची प्रसूती डाॅक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून सुकर करीत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घाटीत कोरोना पाॅझिटिव्ह महिलेची पहिली सिझेरियन प्रसूती झाली. शहरातीलच रहिवासी या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली. डाॅ. रुपाली गायकवाड, डाॅ. संदीप माणिकट्टी, डाॅ. सलेहा कौसर, डाॅ. मयुरा कांबळे यांनी सिझेरियन प्रसूती केली. सिझेरियन प्रसूतीसह एका कोरोनाबाधित गरोदरमातेची नैसर्गिक प्रसूती झाली. मात्र, घाटीत कोरोना गरोदरमातेची प्रसूती होण्याची ही पहिली, दुसरीच घटना नाही. यापूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही येथील डाॅक्टरांनी कोरोना मातांच्या प्रसूती यशस्वी केल्या आहेत. अगदी कोरोनास न घाबरता.

९९ टक्के शिशु कोरोनामुक्तघाटीत एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ३५८ कोरोनाबाधित गरोदरमातांनी उपचार घेतले. यात १९७ महिलांची घाटीत प्रसूती झाली. सुदैवाने ९९ टक्के बाळ हे कोरोनामुक्त राहिले.

गर्भवती महिला बाधित आल्यास, चिंता नकोगर्भवती कोरोना बाधित आल्यास कोणतीही चिंता करण्यासारखी परिस्थिती नसते. ज्याप्रमाणे कोरोनाचे इतर रुग्ण उपचार घेतात, त्याचप्रमाणे त्यांनाही उपचार घ्यावे लागतात. गरोदरपणात कोरोनाची लक्षणे जाणवल्यास वेळीच तपासणी करणे गरजेचे असते. माता आणि बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजारांकडे दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

गरोदरमातांच्या प्रसूतीची सुविधातिसऱ्या लाटेत आतापर्यंत एक नैसर्गिक आणि एक सिझेरियन प्रसूती झाली आहे. सिझेरियन झालेल्या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. आई आणि बाळांची प्रकृती चांगली आहे. मूत्रपिंडविकार व मूत्रपिंडरोपण विभागात कोरोनाबाधित गरोदरमातांच्या प्रसूतीची सुविधा करण्यात आली आहे.- डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादpregnant womanगर्भवती महिला