शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नयेत, म्हणूनच अधिवेशन कालावधी कमी ठेवला: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:27 IST

शेकडो कोटी खर्च करायचे आणि ते चार आणि पाच दिवसांचे अधिवेशन करायचे?

छत्रपती संभाजीनगर: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झाले असतानाच, ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरून सत्ताधारी पक्षावर तीव्र टीका केली आहे. विदर्भावर अन्याय होऊ नये म्हणून नागपूर करार झाला असताना, अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवून जनतेचे प्रश्न दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अधिवेशन केवळ चार ते पाच दिवसांचे ठेवण्यावरून दानवे यांनी संताप व्यक्त केला. "मुख्यमंत्री स्वतः विदर्भाचे आहेत. विदर्भात होणारे अधिवेशन नागपूर करारामुळे झाले होते. विदर्भावर अन्याय होऊ नये, म्हणून ते वर्षातून एकदा व्हावे, असे ठरले होते. ते काय चार दिवसांचे व्हावे?" असा सवाल दानवे यांनी केला. "शेकडो कोटी खर्च करायचे आणि ते चार आणि पाच दिवसांचे अधिवेशन करायचे? पहिल्या दिवस तर श्रद्धांजली आणि बिल ठेवण्यातच जातो. उरले फक्त पाच दिवस."

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/3272153389605768/}}}}

जनतेचे प्रश्न दडपण्याचा प्रयत्नदानवे यांनी थेट आरोप केला, "खरंतर जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये, अशीच सरकारची इच्छा आहे आणि म्हणूनच अधिवेशन कसं गुंडाळता येईल, कसं कमी करता येईल, असा प्रयत्न सरकार करत आहे."

भास्कर जाधव विरोधी पक्षनेतेपदासाठी 'योग्य'यावेळी अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चेवरही स्पष्टीकरण दिले. "भास्कर जाधव कोणत्याही पदासाठी इकडे तिकडे जाणारा माणूस नाही," असे ठाम मत त्यांनी मांडले. उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ कार्यालयासाठी भास्कर जाधव यांचे नाव सुचवल्याचे त्यांनी स्पष्ट केले."उदय सामंत पदासाठी गेले आहेत," असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे हे ११ आणि १२ तारखेला अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शेतकरी, कबुतर खाना आणि इतर मुद्देअतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तसेच लोढा बिल्डरने आपल्या साइटवरील कबुतरखाना सुरू करावा, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Govt Shortens Session to Suppress Public Issues: Ambadas Danve.

Web Summary : Ambadas Danve criticizes the government for shortening the winter session in Nagpur, alleging it's a deliberate attempt to suppress public issues and prevent opposition from raising concerns. He also addressed opposition leadership discussions and farmer aid delays.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस