शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सायबर भामटे वरचढ; एटीएम कार्डची गुप्त माहिती देण्यात शिकले सवरलेलेच आघाडीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:42 IST

पाच महिन्यांत आर्थिक फसवणूक झालेल्यांचा आकडा हा ४०० पेक्षा अधिक आहे.

- राम शिनगारेऔरंगाबाद : सायबर गुन्हेगारांची सगळीकडेच दहशत आहे. जवळपास प्रत्येकाकडे ॲंड्राॅईड फोन असल्यामुळे ॲपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केले जातात. पण उच्च शिक्षितही फोनवर समोरच्या व्यक्तीने सहजपणे काही माहिती विचारल्यास तत्काळ सांगतात. त्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार फ्रॉड करीत असल्याचे दररोज दिसत आहे.

पाच महिन्यांत ४०० जणांची फसवणूकपाच महिन्यांत आर्थिक फसवणूक झालेल्यांचा आकडा हा ४०० पेक्षा अधिक आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरातील सायबर शाखेकडे एकूण ८७० तक्रार अर्ज दाखल झालेले आहेत. त्यातील अर्धेअधिक अर्ज हे आर्थिक फसवणुकीच्या संदर्भातच आहेत.

डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करून फसवणूक :तुमचे डेबिट- क्रेडिट कार्ड एक्सपायर होत आहे. सेवा कायम ठेवण्यासाठी मेसेज पाठविण्यात येईल. त्यावरील लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरण्यात यावी, असे सांगण्यात येते. शिकलेले लोकच अधिक हुशार असल्याच्या आविर्भावात सर्व माहिती भरून देतात. त्यानंतर काही वेळात बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचे मेसेज येतात. क्रेडिट कार्डवरही काही भूलथापा देऊन खरेदी केली जाते.

केवायसीच्या नावाखाली फसवणूक :तुमची केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड दिलेल्या लिंकवर अपलोड करा. बँकेचा अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर सांगा, असे सायबर भामटे सांगतात.

कार्डशिवाय झालेली फसवणूक :झटपट कर्ज देणारे शेकडो ॲप सध्या धुमाकूळ घालीत आहेत. तत्काळ कर्जाच्या नावाखाली कागदपत्रे मागितली जातात. त्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक होते.

ओटीपी शेअर केल्याने फसवणूक :वेगवेगळ्या थापा मारून एनीडेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. यानंतर मोबाईलची स्क्रीन भामट्यास दिसते. त्याद्वारे बँकेचा आलेला ओटीपी घेऊन फसवणूक केली जाते.

शेकडो तक्रारींचा निपटारासायबर गुन्हे शाखा दररोज येणाऱ्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करते. वॉलेटमध्ये पैसे अडकलेले असतील तर परत मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यानंतर फसवणूक झाली असून, पैसे परत मिळण्याची शक्यता नसेल तर संबंधित ठाण्याला अहवाल पाठवून गुन्हे नोंदविण्यास सांगतात.

फसवणूक झाल्यास तत्काळ माहिती द्याकोणतीही बँक वैयक्तिक माहिती फोनद्वारे विचारत नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोणत्याही व्यक्तीने केलेल्या फोनवर आपल्या बँक खात्याशी संबंधित माहिती कधीही देऊ नये. चुकून देण्यात आली असेल आणि फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर शाखा, जवळच्या पोलीस ठाण्यास कळविले पाहिजे.- गौतम पातारे, निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबाद