शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जमीन मोजणी खर्चाने नागरिकांचे कंबरडे मोडणार; हजारांतील चालान लाखांत

By विकास राऊत | Updated: December 2, 2024 13:20 IST

१ डिसेंबरपासून वाढीव दरांची अंमलबजावणी सुरू

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात १ डिसेंबरपासून जमीन मोजणी दरांमध्ये जबर वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिलाच दणका सामान्यांना बसला आहे. पूर्वीच्या दरांच्या शेतजमीन अथवा प्लॉटच्या मोजणी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जमिनीच्या वादातून भांडण-तंटे वाढत असतानाच आता शेत, प्लॉट मोजणी खर्चाने शेतकरी व नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे. १ डिसेंबरपासून नवीन दरांची अंमलबजावणी सुरू झाली असून यापूर्वी काही हजारांत येणारे मोजणीचे चालान पहिल्याच दिवशी लाखांपर्यंत गेले. यामुळे मोजणीसाठी अर्ज करणाऱ्यांना झळ बसली आहे. राज्यभरात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

हजारांचे चलान गेले साडेचार लाखांतबिगरशेतीसाठी नियमित मोजणी करण्यासाठी एका जमीनधारकाने अर्ज केला होता. ३० नोव्हेंबरपर्यंत मोजणी झाली असती जुन्या दराने शुल्क लागले असते. परंतु नवीन दरानुसार ४ लाख ६५ हजारांचे चलान संबंधितांना गेले आहे. असे वाढीव दरांचे चलान अनेक अर्जदारांना आले असून त्यांना भुर्दंड बसेल.

‘सिस्टीम व्हर्जन २ ’मध्ये ऑनलाइन मोजणी‘सिस्टीम व्हर्जन २’मध्ये ऑनलाइन मोजणीचे काम एप्रिलपासून सुरू झाले आहे. १ डिसेंबरपासून ही सिस्टीम अपडेट झाली आहे. सिस्टीम ज्याला रेफर करेल, त्यानुसार मोजणी करणारे कर्मचारी ठरतील.

विविध क्षेत्रनिहाय असणार दरनवीन परिपत्रकानुसार मोजणी खर्चात वाढ झाली आहे. त्यासाठी विविध क्षेत्रनिहाय वर्गवारी ठरविण्यात आली आहे. मनपा हद्द व ग्रामीण हद्द असे वर्ग मोजणीसाठी करण्यात आले आहेत.

शेतजमीन मोजणीचे दरनियमित मोजणी : २ हजारजलदगती मोजणी : ८ हजार

२ हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यास?दोन हेक्टर व त्यापेक्षा अधिक जमीन असल्यास नियमित १ हजार रुपये व द्रुतगती दर चार हजार रुपये लागेल.

व्यावसायिक भूखंड मोजणी दरव्यावसायिक भूखंड मोजणीसाठी नियमित ३ हजार व जलद गतीने भूखंड मोजण्यासाठी १२ हजार रु. शुल्क लागेल.

मनपा हद्दीतील क्षेत्राचा मोजणी दर अधिक...मनपा व नगरपालिकामध्ये असलेल्या क्षेत्रातील जमीन मोजणीसाठी शुल्क तीन हजार रुपये, जलद गतीचे शुल्क १२ हजार रुपये करण्यात येईल. एक हेक्टर मर्यादेपुढील जमिनीला नियमित शुल्क १५०० रुपये, तर जलद गतीसाठी सहा हजार रुपये लागतील.

१४ वर्षांनंतर दरवाढयापुढे मोजणी ऑनलाइन होईल. काही जमीन मोजणी प्रकारात दर सवलत मिळाली आहे, तर काही जमिनीच्या वर्गवारीमध्ये अल्पशा प्रमाणात दरवाढ झालेली आहे. २०१० नंतर शासनाने दरवाढ केली आहे. नवीन दर प्रणाली १ डिसेंबरपासून राज्यभरात लागू आहे.- नीलेश उंडे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर