शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात रात्री दहा वाजेपर्यंत चालले पदव्यांचे वाटप; जिल्हा परिषद भरतीचे परिणाम

By राम शिनगारे | Updated: September 13, 2023 20:37 IST

दहा ते पंधरा वर्षांपासूनच्या पदव्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या 'रात्री खेळ चाले' अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना पदवी देण्यासाठी मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पदव्यांचे वाटप करण्यात आले.

विद्यापीठात मागील आठवड्यापासून पदव्या घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या आहेत. मागील दहा जे पंधरा वर्षांपूर्वी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमांच्या पदव्यांची मागणी होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेची शिक्षक भरती कारणीभूत ठरली आहे. या भरतीसाठी अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांना पदव्यांची आठवण झाली. त्यातुन मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने पदव्यांचे अर्ज स्विकारण्यासाठी इमारतीच्या बाहेरच स्टॉल लावले आहेत. तसेच त्याचठिकाणी विद्यार्थ्यांकडून पदवीसाठीचा अर्ज स्विकारला जात आहे. मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पदव्यांचे वाटप आणि अर्जांची स्विकृती करण्यात येत होती.

तसेच बुधवारी सकाळीच आठ वाजता पदवी प्रमाणपत्राच्या कामाला सुरूवात झाली. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा हे स्टॉल लावलेल्या ठिकाणी काम संपेपर्यंत ठाण मांडून होते. मंगळवारी रात्री उशिारार्यंत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. योगिता होके पाटील या विद्यार्थ्यांना मदत करताना दिसून आल्या. विद्यार्थी पदवीसाठी अर्ज केल्यानंतर तासाभरातच प्रमाणपत्राची अपेक्षा करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांकडे तर गुणपत्रिका नाहीत. त्याशिवाय पदव्यांची मागणी करीत आहेत. विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारीही मदतीसाठी धावले आहेत.

पाच दिवसात अडीच हजार पदव्यामागील पाच दिवसांमध्ये तब्बल अडीच हजार पदव्यांचे वाटप परीक्षा विभागाने केले आहे. प्रतिदिनी चारशेपेक्षा अधिक अर्ज दाखल होत आहेत. जि.प. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी केवळ प्रतिदिनी १० ते १२ अर्ज पदवी प्रमाणपत्रासाठी येत हाेते. आता हा आकडा ४०० पटीने वाढला आहे.

विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदतविद्यार्थ्यांनी पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तात्काळ प्रमाणपत्र घेऊन गेले पाहिजे. पदवी प्रमाणपत्र जसा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, तसेच हे प्रमाणपत्र वेळेच्या आत घेऊन जाण्याचे हे त्यांचे कर्तव्य आहे. वेळीच कर्तव्य पूर्ण केले असते तर विद्यापीठ प्रशासनावर अधिकचा ताण आला नसता. तरीही प्रशासन विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करीत आहे.-डॉ.श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण