शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री म्हणाले,'तुम्ही लढा'; संजय शिरसाट म्हणाले,'दिल्ली नको रे बाबा!'

By बापू सोळुंके | Updated: April 16, 2024 11:31 IST

औरंगाबाद लोकसभेची जागा शिंदेसेनेकडेच; रविवारी मध्यरात्री विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यात झाला संवाद

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री चिकलठाणा विमानतळावर आमदार संजय शिरसाट यांनाच तुम्ही निवडणूक लढता का, असे विचारले. मात्र आपण लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगून टाकले, अशी माहिती स्वत: आ. शिरसाट यांनीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

भाजप आणि शिंदेसेनेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असली तरी ही जागा शिंदेसेनेकडे गेल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे इच्छुक आहेत. मात्र महायुतीमधील जागा वाटपाचा घोळ न संपल्याने शिंदेसेनेने औरंगाबादच्या उमेदवाराची घोषणा लांबविली आहे.

मुख्यमंत्री शिंदे चिकलठाणा विमानतळावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी आ. शिरसाट, जंजाळ आणि विनोद पाटील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी उमेदवाराविषयी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आ. शिरसाट यांनाच ‘तुम्ही औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढविता का?’ अशी विचारणा केली. तेव्हा आ. शिरसाट यांनी दिल्लीला जाण्यास इच्छुक नसल्याचे नम्रपणे सांगितले. 

रात्री घडलेला हा किस्सा आ. शिरसाट यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी शेअर केला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी काही दिवसापूर्वी औरंगाबाद लोकसभेसाठी आ. शिरसाट हे भुमरेपेक्षा सरस उमेदवार असल्याचे विधान केले होते.

मुख्यमंत्री आज घेणार निर्णय आमच्याकडे पालकमंत्री संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ आणि विनोद पाटील हे तीन जण इच्छुक आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारीसंदर्भात मंगळवारी निर्णय घेणार असल्याचे शिंदेसेनेचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी सांगितले.

नाशिकची जागा देखील शिवसेनेचीनाशिकची जागा राष्ट्रवादीला हवी असल्याचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाल्याकडे आ. शिरसाट यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, महायुतीमध्ये सामजंस्याची भूमिका  मुख्यमंत्र्यांनीच घ्यायची का, असा सवाल केला.  पटेल यांनी उगाच उड्या मारू नये, नाशिकची , छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच आहे. ही मिळविण्यासाठी प्रतिष्ठापणाला लागली  असल्याचेही ते म्हणाले.  रत्नागिरी जागेसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदे