औरंगाबाद : शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या कार्यरत तसेच निवृत्त व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.पन्नालालनगर येथील यशोमंगल कार्यालय येथे रविवार, दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सोहळ्याला सुरुवात होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. शरद पिंगळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. नीळकंठ बापट यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल या क्षेत्रात कार्यरत असलेले व निवृत्त झालेल्या ज्येष्ठ व्यक्तींविषयी ऋणनिर्देश करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. समाजातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी याद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या सोहळ्यास ब्राह्मण समाजातील लहान-थोरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी केले आहे.
विश्व ब्राह्मण संस्थेतर्फे कृतज्ञता सोहळा
By admin | Updated: September 18, 2014 00:42 IST