शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार रुपयांची रक्ताच्या कर्करोगाची चाचणी स्वस्तात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:24 IST

खाजगी लॅबमध्ये ३ ते १० हजार रुपये मोजून करावी लागणारी रक्ताच्या कर्करोगाची चाचणी आता स्वस्तात करता येणे शक्य होणार आहे. ही चाचणी करणारे तब्बल ८० लाखांचे यंत्र घाटी रुग्णालयात दाखल झाले असून, या यंत्राचे रविवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे यांच्या हस्ते उद््घाटन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खाजगी लॅबमध्ये ३ ते १० हजार रुपये मोजून करावी लागणारी रक्ताच्या कर्करोगाची चाचणी आता स्वस्तात करता येणे शक्य होणार आहे. ही चाचणी करणारे तब्बल ८० लाखांचे यंत्र घाटी रुग्णालयात दाखल झाले असून, या यंत्राचे रविवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे यांच्या हस्ते उद््घाटन झाले.घाटीत विकृतीशास्त्र विभाग व मेडिकल रिसर्च सोसायटी यांच्या वतीने रविवारी महाविद्यालयातील महात्मा गांधी सभागृहात ‘रक्ताचा कर्करोग’ या विषयावर कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी डॉ. बारपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, विभागप्रमुख डॉ. आर.एस. बिंदू, डॉ. ए.आर. जोशी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या उद््घाटनानंतर रक्ताच्या कर्करोगाच्या चाचणीसाठी प्राप्त झालेल्या फ्लोसायटोमीटर या ८० लाखांच्या यंत्राचे उद््घाटन झाले.यावेळी डॉ. बारपांडे म्हणाले की, अत्याधुनिक यंत्रसामग्री रुग्णांवरील उपचारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात; परंतु यंत्रांचा आधार घेऊन निदान करण्यासह डॉक्टरांनी वैद्यकीय उपचारातील ज्ञान वाढविण्यावरही भर द्यावा. केवळ यंत्रांवर अवलंबून राहू नये. या यंत्रांचा रुग्णांच्या उपचारासाठी अधिकाधिक फायदा होईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. वर्षा रोटे, डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. भारत सोनवणे, डॉ. आर.एस. बिंदू यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत २०० पेक्षा अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन डॉ. मंजूषा ढवळे यांनी केले. डॉ. शुभज्योती पोरे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी डॉ. सुनीता पाटील, डॉ. प्रगती फुलगीरकर, डॉ. अंजली कुलकर्णी यांच्यासह विकृतीशास्त्र विभागातील अधिकारी-कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.मराठवाड्यात पहिले उपकरणआतापर्यंत रक्ताच्या कर्करोगाच्या निदानाची चाचणी मुंबईला करावी लागत होती. त्यासाठी दहा हजारांपर्यंतची रक्कम लागते. घाटीत आठवड्याला किमान दहा ते बारा रुग्णांची चाचणी करावी लागते. मराठवाड्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळणारे हे पहिले उपकरण आहे. या उपकरणामुळे ही चाचणी आता घाटीत होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले. या उपकरणामुळे मोठी सुविधा झाल्याचे विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आर.एस. बिंदू म्हणाले.