शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

‘तेरे संग प्यार में नहीं तोडना...’ क्षत्रबलाक पक्ष्याच्या जोडीची विरह अन् पुनर्मिलनाची गोष्ट

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 23, 2024 13:21 IST

रोज त्याच जागी येऊन आजारी क्षत्रबलाक नर पक्ष्याची तब्बल ४८ दिवस मादी प्रतीक्षा करत होती

छत्रपती संभाजीनगर : आजारी असलेल्या आपल्या जोडीदाराला क्षत्र बलाक पक्षी (नर) माणसांनी कुठे नेले... हा प्रश्न तिला पडला असावा, म्हणून ‘दुर्मीळ क्षत्र बलाक पक्षी (मादी)’ विरहाने तळमळत होती. व्याकूळ होऊन ती जोडीदार परतण्याची प्रतीक्षा करीत होती...अखेर तब्बल ४८ दिवसांनी तिचा साथीदार तिला सुखरूप अवस्थेत भेटला... दोघांनी एकामेकांना चोंच लावले, तिने चोचीनेच त्याच्या शरीरावर स्पर्श केला व आनंदात त्या दोघांनी आकाशात भरारी घेतली.

ही काही चित्रपटातील कथा नव्हे. दौलताबाद परिसरातील वनविभागाच्या नर्सरीत घडलेली सत्य घटना आहे.  ४ जुलै रोजी दौलताबाद घाटात एका शेतकऱ्याला आजारी असलेल्या क्षत्र बलाक नर पक्षी सापडला. त्याने उपवनसंरक्षक सूर्यकांत मकावार यांच्याकडे पक्ष्याला दिले. त्याची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी तात्काळ नाशिक मसरूळ येथील वन्यजीव उपचार केंद्रात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर, कार्यालयाने परवानगी घेण्यात आली. म्हसरूळ येथे डॉ. हेमराज सुखवाल यांनी त्या पक्ष्यावर ४८ दिवस उपचार केले. तो पक्षी पूर्णपणे आजारातून बरा झाला. त्यास पुन्हा दौलताबाद येथे आणण्यात आले. तिथे २२ ऑगस्टला त्याच्या साथीदाराकडे वन्य अधिवासात यशस्वीरीत्या सोडण्यात आले. यानंतर दोन्ही क्षत्र बलाक पक्ष्यांची भेट झाली आणि त्यांनी आकाशात झेप घेतली. ही भेट मंकावार यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेहेरकर, वनपाल सुधीर धवन, वनजीव रक्षक वैभव भोगले, वन्यजीव बचाव दलाचे प्रमुख आशिष जोशी, रेस्क्यू टीमचे सार्थक अग्रवाल हे या घटनेचे साक्षीदार ठरले.

‘ ती’चा शोध...क्षत्रबलाक पक्षी (नर) जिथे आजारी पडला होता. ती जागा म्हणजे दौलताबादेतील घाटात एका शेतकऱ्याच्या शेतातील. आजारी नर पक्षी आढळल्यानंतर त्यास जवळील वन विभागाच्या नर्सरीत नेण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी नाशिकला नेण्यात आले. त्या पक्षाची ‘मादी’ आपल्या साथीदाराला शोधत नर्सरीपर्यंत आली. ती आपल्या साथीदाराच्या शोधात दररोज सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान नर्सरीत येत असे. सगळीकडे व्याकूळ नजरेने बघत असत. नंतर ती उडून जात व परिसरातील उर्दू शाळेच्या आसपास मुक्काम करीत होती. सलग ४८ दिवस ती नर्सरीत येत राहिली. साथीदार येईपर्यंत ती नर्सरीत सर्वत्र विहार करीत व साथीदाराचा शोध घेत होती. अखेर साथीदार भेटल्यावर ते दोघे आपल्या अधिवासात उडून गेले ते नंतर दिसले नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforest departmentवनविभागenvironmentपर्यावरण