शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चरसची तस्करी करणाऱ्याची दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम

By admin | Updated: March 15, 2016 00:37 IST

औरंगाबाद : चरसची तस्करी केल्याच्या आरोपाखाली विशेष सत्र न्यायाधीश (एनडीपीएस) एस. जी. शेटे यांनी अहमद मोईउद्दीन ऊर्फ

औरंगाबाद : चरसची तस्करी केल्याच्या आरोपाखाली विशेष सत्र न्यायाधीश (एनडीपीएस) एस. जी. शेटे यांनी अहमद मोईउद्दीन ऊर्फ महंमद अक्रम महंमद इकबाल यास दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला होता. अहमद मोईउद्दीनने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी जिल्हा न्यायालयाची शिक्षा कायम ठेवत आरोपीचे अपील फेटाळले.औरंगाबाद दहशतवादविरोधी पथकातील जमादार अंकुश राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीआधारे पोलीस निरीक्षक किशोर कांबळे, शिवा ठाकरे, गोरख जाधव, शशिकांत शिनगारे आदी ३२ कर्मचाऱ्यांच्या पथकाने १७ जानेवारी २०११ रोजी सिडको बसस्थानकावर सापळा रचून अहमद मोईउद्दीनला ताब्यात घेतले होते. त्याच्या जवळच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये उग्र दर्प असलेल्या हिरवट काळ्या रंगाच्या ओलसर व बुरशी आलेल्या गोळ्या सापडल्या. त्या गोळ्या चरस असल्याचे मोईउद्दीनने सांगितले. पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांच्या तक्रारीवरून अहमद मोईउद्दीनविरुद्ध एटीएसचे पोलीस ठाणे असलेल्या मुंबई येथील काळा घोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या खटल्याची सुनावणी औरंगाबादेतील विशेष सत्र न्यायाधीश (एनडीपीएस) एस. जी. शेटे यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता राजेंद्र मुगदिया यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने ही विनंती गाह्य धरून चरसची तस्करी करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी, १ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेस अहमद मोईउद्दीन याने औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. या अपिलावर न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली असता सरकारी वकील राजेंद्र ढासळकर यांनी बाजू मांडली. चरस तस्करास अधिक शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद केल्याने खंडपीठाने वरील आदेश दिला.