शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: July 1, 2017 00:48 IST

औरंगाबाद : पहिल्या पत्नीला सोडून तेरा वर्षांच्या मुलीसोबत संसार थाटून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम. सय्यद यांनी १० वर्षे सश्रम कारावास ठोठावला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पहिल्या पत्नीला सोडून तेरा वर्षांच्या मुलीसोबत संसार थाटून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम. सय्यद यांनी १० वर्षे सश्रम कारावास आणि एकूण १५ हजार रुपये दंड ठोठावला.या प्रकरणी खुलताबाद तालुक्यातील पळसगाव येथील पीडित मुलीच्या पित्याने ९ मार्च २०१३ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २१ जानेवारी २०१३ रोजी आरोपी राजू भिका अभंग (३०), राहणार सोयगाव, तालुका कन्नड याने पीडित मुलीला फूस लावून पळवून नेले. मुंबईसह इतरत्र फिरवून तिच्यावर अत्याचार केला आणि पहिल्या पत्नीला सोडून अल्पवयीन मुलीशी संसार थाटला. पीडित मुलीच्या पित्याने तक्रार दिल्यानंतर सात-आठ महिन्यांनंतर संबंधित मुलगी तिच्या नातेवाईकांकडे सापडली तेव्हा ती गरोदर होती. त्यानंतर आरोपी राजूला मुंबईतून अटक करण्यात येऊन त्याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६ आणि ३६३, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ५ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. कलम ३७६ व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ५ व ६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला २ वर्षे जादा कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सक्तमजुरी आणि कलम ३६३ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने जादा कारावास भोगावा लागेल, असेही आदशात म्हटले आहे. आरोपीने दंड भरल्यास ती रक्कम पीडितेला देण्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.