शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

मनपाने काढली दहा अनधिकृत धार्मिक स्थळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:48 IST

शहरातील ११०१ धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सध्या सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यासाठी चक्क चतुर्थश्रेणी (सफाई कामगार) कर्मचाºयांचा वापर केला होता. या कामगारांनी दिलेल्या यादीनुसार शहरातील ११०१ धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सध्या सुरू आहे. खाजगी जागेवरील धार्मिक स्थळे मनपाने अनधिकृत ठरविली आहेत. सोमवारी मुकुंदवाडी भागातील एका खाजगी जागेवरील धार्मिक स्थळ पाडण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले होते. जागृत नागरिकांनी दाखविलेल्या कागदपत्रांमुळे मनपाच्या पथकाला परतावे लागले. मनपा प्रशासनाने दिवसभरात दहा अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. या कारवाईसंदर्भात शिवसेनेने खंडपीठात धाव घेतली.सोमवारी सकाळी महापालिकेची चारही पथके कारवाईसाठी सकाळी १० वाजता बाहेर पडली. प्रथम नारळीबाग येथे खुल्या जागेवरील हनुमान मंदिर काढण्यात आले. मंदिर पाडू नये यासाठी परिसरातील नागरिकांनी, भाविकांनी बाराच आटापिटा केला. खंडपीठाच्या आदेशानुसार कारवाई सुरू असल्याचे वारंवार सांगितल्यानंतर मनपाने कारवाई केली. त्यापाठोपाठ जळगाव रोडवर सर्व्हिस रोडलगत असलेले मांगीरबाबा मंदिर काढण्यात आले. काचीवाडा येथे एक दर्गा होता. दर्ग्याची देखभाल करणाºया नागरिकांना विश्वासात घेऊन कारवाई करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून हा दर्गा असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे होते. बारापुल्ला गेट येथे मांगीरबाबाचे मंदिर होते. हे मंदिरही मनपाच्या पथकाने काढले.सिडको एन-२ भागातील ठाकरेनगर येथे ग्रीन बेल्टमध्ये दुर्गामाता मंदिर बांधण्यात आले होते. श्रावण मासानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू होते. मनपाचे पथकप्रमुख वसंत निकम, महावीर पाटणी तेथे पोहोचले. मंदिर पाडू नये अशी विनंती माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे, नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांच्यासह शेकडो भाविकांनी केली. मंदिर पाडणार म्हणताच परिसरातील महिला भाविकांनी एकच आक्रोश सुरू केला. महिलांना अश्रू अनावर झाले होते. तब्बल दोन तास भाविकांची समजूत घातल्यानंतर मंदिर पाडण्यास सहमती दिली.तत्पूर्वी सिडको एन-५ येथे उपायुक्त अय्युब खान, सहायक नगररचनाकार जयंत खरवडकर आपल्या पथकासह पोहोचले. या भागातील खुल्या जागेवर बांधण्यात आलेले छोटेसे श्रीकृष्ण मंदिर काढण्यात आले. रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरातील कालभैरव मंदिरही मनपाच्या पथकाने काढले. एकनाथनगर येथील ओंकारेश्वर मंदिर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील मोहिनीराज मंदिर, शिवाजी कॉलनी येथील महादेव मंदिर, सिडको एन-६ आविष्कार कॉलनी येथील मंदिर काढण्यात आले.