शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

दहा संघटनांनी दर्शवला विरोध

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

वसमत : नगर पालिकेने शहराच्या हद्दीत बीओटी तत्वावर कत्तलखाना उभारण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

वसमत : नगर पालिकेने शहराच्या हद्दीत बीओटी तत्वावर कत्तलखाना उभारण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आजपर्यंत दहा संघटनांनी या निर्णयास विरोध दर्शविला आहे. जनतेच्या भावनेची दखल घेत माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी न. प. तील सत्ताधाऱ्यांना कत्तलखान्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे कत्तलखाना निविदा प्रक्रिया रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. नगरपालिकेने सर्व्हे नंबर ३९ वरील जागेवर कत्तलखाना उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. पालिकेत भाजपा- शिवसेनेची सत्ता आहे. व सध्या अध्यक्षपद भाजपाकडे आहे. असे असताना कत्तलखाना उभारणीचा निर्णय झाल्याने शहरातील नागरिक प्रचंड चक्रावून गेले आहेत. हा नियोजित कत्तलखाना होवू नये, पशुधन देशोधडीला लावण्याच्या या प्रकारास वसमतमधील नगरसेवकांनी पाठिंंबा देवू नये, अशी मागणी वाढत आहे. कत्तलखान्याच्या विरोधात आजपर्यंत १० संघटनांनी दंड थोपटले आहेत. प्रशासनाकडे निवेदने सादर केली जात आहेत. वसमत येथील गोवंश वाचवा कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलन उपविभागीय कार्यालयासमोर सुरू केले आहे. तर श्रीकृष्ण मंदिर, महानुभाव आश्रम, श्री जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज श्री संप्रदाय तालुका सेवा समिती, जनहित मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक जागृत मंच, अ‍ॅड. संदीप भालेराव मित्रमंडळ, भ्रष्टाचार विरोधी समिती, राष्ट्रमाता सेवाभावी संस्था, गोहत्या विरोधी समिती, श्रीराम गोरक्षा दल आदी संघटनांनी कत्तलखान्याच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. नगर पालिकेला कत्तलखान्याची निविदा रद्द करण्यास भाग पाडू अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा अ‍ॅड. संदीप भालेराव यांनी दिला आहे. कत्तलखान्याचे समर्थक नगरसेवक व पदाधिकारी कोण आहेत, हे आता निविदा मंजूरीसाठी बोलाविलेल्या सभेतच स्पष्ट होणार असल्याने शहरातील नागरिक निविदा रद्द होतात की कत्तलखाना उभारणीसाठी सर्वांचे एकमत होते किंवा कसे? याकडे लक्ष ठेवून आहेत. नागरिकांच्या संतप्त भावना पाहता नगर पालिका प्रशासन व सत्ताधारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)कत्तलखाना होणार नाहीवसमत नगरपालिकेने कत्तलखान्यासाठी निविदा काढली असली तरी शहर व तालुक्यातील जनतेच्या भावना पाहता हा नियोजित कत्तलखाना होवू देवू नये व हा निर्णय रद्द करावा, अशा सूचना आपण नगराध्यक्ष व शिवसेना- भाजपाच्या सदस्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता वसमतमध्ये कत्तलखाना होणारच नसल्याची ग्वाही शिवसेनेचे माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.