लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात विविध ठिकाणावरून मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीला कदीम जालना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून विविध कंपनीच्या ५ लाख २० हजार रूपये किंमतीच्या दहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या.लक्ष्मीनारायण नगर येथील शिव सदानंद बिल्लेवार यांची घरासमोर लावलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना ७ मे रोजी घडली होती. याप्रकरणी बिल्लेवार यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना बघता पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी चोरीचा छळा लावण्यासाठी पथकाची नेमणूक केली. मंगळवारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार काहीजण चोरीची मोटरसायकल विक्री करीत असल्याची कळल्याने संशयावरून सतीश पंढरीनाथ पिंपळे (१९, रा. चंदनझिरा), संतोष भास्कर जाधव (२०, रा.भवानीनगर जुना जालना) या दोघांना अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच दोघांनी रेल्वेस्टेशन, चंदनझिरा, नूतनवसाहत, गांधीचमन आदी परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची पोलिसांना सांगितले. आणि विविध ठिकाणी लपून ठेवलेल्या दहा दुचाकी पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केल्या.
चोरट्यांकडून दहा मोटरसायकली जप्त
By admin | Updated: May 10, 2017 00:47 IST