सेलू- यावर्षी प्रथमच निम्न दुधना प्रकल्पात दहा दलघमी पाणीसाठा वाढला आहे़ पावसाअभावी यावर्षी प्रकल्पात केवळ एकोणतीस टक्के जिवंत पाणीसाठा होता़ दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्याने दुधना प्रकल्पात पाण्याची आवक होत आहे़ सध्या ३३़४० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे़ जालना जिल्हयात पाऊस झाल्या नंतर निम्न दुधना प्रकल्पात पाणी येते़ परंतू तीन महिन्यात दमदार पाऊस नसल्यामुळे प्रकल्पात पाणी आले नव्हते़ जालना जिल्हयातील रांजणी, मंठा या परिसरात दोन दिवसांपासून पाऊस होत आहे़ त्यामुळे प्रकल्पाची पाणी पातळीत चार टक्क्याने वाढली. प्रकल्पात सध्या १८३ दलघमी पाणीसाठा असून, ८१ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे़, अशी माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाल्यास आगामी काळातील पाणीप्रश्न मिटणार आहे.
दुधनात दहा दलघमी ने पाणी पातळी वाढली
By admin | Updated: August 27, 2014 23:38 IST