शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दहा बालकांना हृदयविकार

By admin | Updated: March 18, 2017 00:08 IST

उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २५० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैैकी दहा बालकांना हृदयविकार असल्याचे समोर आले आहे.

उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २५० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैैकी दहा बालकांना हृदयविकार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सदरील दहा बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.उपजिल्हा रुग्णालयातील गुरूवारी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्र्यक्रमांतर्गत विविध आजाराने त्रस्त असलेल्या २५० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैैकी १८ बालकांना दृष्टिदोष असल्याचे आढळून आले. हाडांच्या आजाराने त्रस्त असलेल्या ४४ बालकांच्या आरोग्य तपासणीतून २० बालकांची जीभ चिकटणे, ऐकू कमी येणे, टॉन्सिल इ. आजार असल्याचे निष्पन्न झाले. तपासणी करण्यात आलेल्या १८ कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनाकरिता जिल्हा रुग्णालयातील ‘डीईआयसी’ या विभागामार्फत वैद्यकीय संदर्भसेवा देण्याचा सल्ला बालरोग तज्ञांनी दिला.आरोग्य शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. बालरोग तज्ज्ञ डॉ. विनोद जाधव, डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. कोमल जाधव, डॉ. काळे, डॉ. महावीर कोचेटा यांनी या बालकांची तपासणी केली. शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. मुजीब मोमीन, डॉ. विनिता पंडित, डॉ. एस. टी. राठोड, डॉ. सुहास भोसले, मीरा सातपुते, अश्विनी शिंदे, अश्विनी फंड, गीता महामुनी यांनी परिश्रम घेतले. हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त असलेल्या बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मुंबई, पुणे येथील रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास जाधव यांनी दिली.(वार्ताहर)