खंडाळा : टेम्पोने बैलगाडीला धडक दिल्याने बैलगाडीतील एक जण ठार झाला, तर एक बैल गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वैजापूर-खंडाळा रस्त्यावर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. संतोष भारत त्रिभुवन असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते रसवंतीचालक होते.
खंडाळा गावातील महारुख फाटा वस्तीवर राहणारे संतोष भारत त्रिभुवन यांनी वैजापूर-खंडाळा रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ रसवंती सुरू केलेली आहे. सोमवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे सात वाजेदरम्यान बैलगाडीच्या साहाय्याने रसवंतीवरून घरी निघाले. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने (एम.एच.०४ एफ.डी. ४१७९) त्यांच्या बैलगाडीला जोराची धडक दिली. त्यात बैलगाडीवरील संतोष त्रिभुवन हे खाली पडून गंभीर जखमी झाले, तर एका बैलालादेखील जबर मार लागला. त्रिभुवन यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यासंदर्भात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
------------
फोटो : १) मयत संतोष त्रिभुवन.
फोटो २) अपघातात जखमी झालेला बैल
फोटो
२) धडक दिलेला आयशर टेम्पो