औरंगाबाद : जिब्राल्टर बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची तेजस्विनी राजेंद्र सागर हिने चमकदार कामगिरी करीत दोन हजार पाऊंडचे पारितोषिक जिंकले. आंतरराष्ट्रीय वूमन इंटरनॅशनल मास्टर तेजस्विनी सागर हिने या स्पर्धेत दोन आंतरराष्ट्रीय मास्टर्स खेळाडूंना पराभूत केले. ग्रँडमास्टर, इंटरनॅशनल मास्टर आणि वूमन इंटरनॅशनल मास्टर यांच्याविरुद्धचे डाव तिने बरोबरीत सोडवले. या स्पर्धेत भारताच्या पी. हरिकृष्णासह जगभरातील नामांकित बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेतील लक्षवेधक कामगिरीमुळे तिने ५३ येलो गुणांची कमाई केली. या स्पर्धेदरम्यान तिला विश्वविजेत्या अॅरोनियन लेव्हन भेट घेण्याची संधी मिळाली. यावेळी अॅरोनियन यांनी तेजस्विनीला महत्त्वपूर्ण टिप्सही दिल्या.या स्पर्धेआधी तेजस्विनी स्पेन येथील रॉकेटा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. तसेच त्यानंतर तिने बार्सिलोना येथे लिगा कॅटलुनिया स्पर्धेत गतविजेत्या सबाडेल चेसी या संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत तिने ९ फेºयात ८ गुण मिळवले. हा संघ ब गटात चॅम्पियन ठरला. आता १९ फेब्रुवारी रोजी तेजस्विनी फ्रान्सला खेळणार आहे. या दौºयात ती स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये खेळणार आहे. आगामी १ ते १0 एप्रिलदरम्यान होणाºया आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्याचा तिला विश्वास वाटतोय.
जिब्राल्टर बुद्धिबळ स्पर्धेत तेजस्विनी सागर चमकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:04 IST