तामलवाडी : एका २७ वर्षीय युवकाने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली़ ही घटना शुक्रवारी सकाळी गवळेवाडी (ता़तुळजापूर) शिवारात घडली असून, या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गवळेवाडी येथील भैरवनाथ जनार्धन माने (वय-२७) हा युवक पुणे येथे टेम्पोचा चालक म्हणून काम करतो़ या युवकाने शुक्रवारी सकाळी गावच्या शिवारातील जनार्धन नकाते यांच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले़ या प्रकरणी मयताचा भाऊ तात्यासाहेब माने यांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास बीट अंमलदार राऊत हे करीत आहेत़खिशात सापडली चिठ्ठीघटनास्थळी दाखल झालेले पोलीस कर्मचारी लिंबाजी राऊत, विजूरथ भोसले, शिवाजी देशमुख हे मयताच्या पार्थिवाची तपासणी करीत असताना खिशात एक चिठ्ठी आढळून आली आहे़ त्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये, असे लिहिले आहे़ त्यामुळे भैरवनाथ माने याने आत्महत्या का केली ? याचे गुढ मात्र कायम आहे़
युवकाची आत्महत्या
By admin | Updated: April 16, 2016 00:14 IST