औरंगाबाद : पुणे येथे ८ ते १४ फेब्रुवारीदरम्यान शालेय राष्ट्रीय सायकल स्पर्धेत औरंगाबाद येथील क्रीडा संघटक भिकन अंबे यांची शालेय राष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. भिकन अंबे हे राज्य सायकल संघटनेत खजिनदार आहेत, तसेच १९८५ ते १९९७ यादरम्यान त्यांनी राष्ट्रीय सायकल स्पर्धा गाजवली आहे, तसेच चौका घाट, दौलताबाद घाटाचा राजा हा किताबही त्यांनी पटकावला आहे. त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, जिल्हा अधिकारी केंद्रे, सचिन पुरी, गोविंद शर्मा, पंकज भारसाखळे, अमृत बिºहाडे, जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव, विनायक सरवदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी भिकन अंबे असणार तांत्रिक अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:49 IST