शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

ट्रकखाली चिरडून एक जागीच ठार

By admin | Updated: September 5, 2014 00:10 IST

हिंगोली/कनेरगाव नाका : भरधाव ट्रकखाली चिरडून ४५ वर्षीय मुख्याध्यापक जागीच ठार झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली.

हिंगोली/कनेरगाव नाका : भरधाव ट्रकखाली चिरडून ४५ वर्षीय मुख्याध्यापक जागीच ठार झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शहराजवळील बळसोंड भागात घडली. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या चालकास ट्रकसह कनेरेगाव नाका येथे पकडण्यात आले.हिंगोलीहून वाशिमकडे निघालेल्या ट्रक (क्र. आर. जे. १४ जी.डी. ३८७१) च्या चालकाने वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीस धडक दिली. या अपघातात वसंत टोपाजी पवार (वय ४०, रा. औंढा नागनाथ) हे ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाले. ही घटना हिंगोली- वाशिम मार्गावरील बळसोंडजवळील दालमिलसमोर घडली. याबाबत माहिती मिळताच हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मोरे, पोनि दिलीप ठोंबळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार एन. आर. राठोड, पोना शेख शकील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर चालकाने ट्रकसह पोबारा केला. पोलिसांनी याबाबतची माहिती तात्काळ वायरलेसवरून कनेरगाव नाका येथील पोलीस दुरक्षेत्र चौकीस कळवली. कनेरगाव येथील कैलास गावंडे यांनाही सदरील ट्रकचा क्रमांक मिळाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून कनेरगाव नाका येथे चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भुमीराज कुमरेकर, शाम खुळे, सुखदेव पहारे, ग्रामसुरक्षा दलाचे पदाधिकारी लखण जयस्वाल, होमगार्ड भारत राऊत यांनी हिंगोलीकडून आलेल्या प्रत्येक ट्रकची तपासणी केली. आंध्रप्रदेशातील गुंटूरहून दिल्लीकडे निघालेल्या ट्रकने हिंगोलीत एकास धडक देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता सदरील वाहन कनेरगाव येथे पकडण्यात आले. ट्रक चालकाचे नाव गोपाल जाट (रा. खंडेल जि. जयपूर राजस्थान) असे असून त्यास वाहनासह कनेरगाव चौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या अपघातात मृत्यूमुखी पडलेले वसंत पवार हे हिंगोली तालुक्यातील बासंबा केंद्रांतर्गत येणाऱ्या येळी येथील जि.प. प्राथमिक शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शिक्षकदिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाची पुर्व तयारी करून ते दुचाकीवरून एका कामगारास हिंगोलीत सोडण्यासाठी गेले होते. काम आटोपून शाळेकडे परत जात असताना बळसोंड भागात रस्त्याच्या कडेला उभे असताना ही दुर्घटना घडली. (प्रतिनिधी)दुचाकीचालक ठारहिंगोली : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकीवरील रामदास आबाजी कवाने (रा.येहळेगाव तु.) यांचा मृत्यू झाला. ही घटना कळमनुरी- बाळापूर रस्त्यावरील कामठा फाटा येथे बुधवारी घडली. खंडू कवाने यांनी पोलिसांना ही माहिती दिली.