शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

युवक महोत्सवासाठी २०७ महाविद्यालयांचे संघ सज्ज; २ हजार विद्यार्थी विद्यापीठात येणार

By योगेश पायघन | Updated: October 14, 2022 21:00 IST

रविवारी सकाळी साडेआठ ते अकरा वाजेदरम्यान शोभायात्रेने महोत्सवाची सुरूवात होईल.

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सवाला रविवारी सुरूवात होत आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत २०७ महाविद्यालयांनी संघांची नोंदणी केली. १२०० विद्यार्थीनी तसेच ८०० विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होण्याचा अंदाज असून त्यानुसार तयारी अंतिम टप्प्यात आहे. शनिवारी दुपारनंतर काही संघ विद्यापीठात दाखल होतील. असे विद्यार्थी विकास संचालक डॉ.संजय सांभाळकर यांनी सांगितले.

रविवारी सकाळी साडेआठ ते अकरा वाजेदरम्यान शोभायात्रेने महोत्सवाची सुरूवात होईल. सकाळी अकरा वाजता. नाटयशास्त्र विभागाच्या प्रांगणात सृजन रंग हा मुख्य रंगमंच उभारण्यात आला आहे. या ठिकाणी उद्घाटन सोहळा होईल. लेखक, दिग्दर्शक अरिंवद जगताप यांच्या हस्ते व अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले असतील.दुपारी दोन वाजेनंतर सातही स्टेजवर विविध कलाप्रकारांचे सादरीकरण नियोजित करण्यात आले आहे. रात्री दहा वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम मंगळवारपर्यंत आयोजित करण्यता आले आहे. समारोप व बक्षिस वितरण सोहळा अभिनेता भारत गणेशपुरे, सुहास सिरसाट यांच्या उपस्थितीत होईल. असे डाॅ. सांभाळकर यांनी सांगितले.

दिवसभर बैठक, आढावा सत्रकेंद्रीय युवक महोत्सव चार दिवसात सहा विभागात ३६ कला प्रकारात हा महोत्सव रंगणार असून सात रंगमंचाची उभारणी पुर्ण झाली आहे. युवक महोत्सवासाठी लोकरंग नाटयगृह पाकींग, नाटयरंग नाटयगृह, नादरंग मानसशास्त्र विभाग, नटरंग शिक्षक भवन प्रांगण, शब्दरंग संस्कृत विभाग व ललित रंग ललित कला विभाग हे सात रंगमंच उभारण्यात आले आहेत. या तयारीसाठी दिवसभर प्रकुलगुरू डाॅ. श्याम शिरसाट, कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांचे बैठक सत्र, आढावा शुक्रवारी सुरू होता. तर महोत्सवासाठी स्थापन विविध समित्या नियोजनात व्यस्त होत्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद