तुळजापूर : शहरातील जिजामाता नगर भागात राहणाऱ्या एका २८ वर्षीय शिक्षिकेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली़ ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर शहरातील जिजामाता नगर भागात राहणाऱ्या संगिता पद्मराज गडदे (वय-२८) या शिक्षिकेने रविवारी रात्री राहत्या घरी गळफास घेतली़ नातेवाईकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते़ मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत डॉ़ मकरंद बाराते यांनी दिलेल्या माहितीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोउपनि रविकांत भंडारी हे करीत आहेत़ दरम्यान, मयत संगिता गडदे या तालुक्यातील केमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या़ या घटनेने शहरासह परिसरात खळबळ उडाली असून, शिक्षिकेच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे़ (वार्ताहर)
तुळजापुरात शिक्षिकेची आत्महत्या
By admin | Updated: May 3, 2016 00:15 IST