शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांना मराठी शिकवा; कायद्याने पूर्ण प्रश्न सुटणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 16:19 IST

ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांचे मत 

ठळक मुद्देमसापच्या बैठकीस अल्प प्रतिसाद पाच जण स्टेजवर, ३२ जण समोर

औरंगाबाद : परप्रांतीय मराठी शिकायला तयार आहेत; पण त्यांना मराठी शिकविण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे, असे मत आज येथे मराठीचे प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केले. 

ते मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात सायंकाळी बोलत होते. मराठीच्या अस्तित्वासाठी कायदा करा, ही मागणी सध्या जोर धरीत आहे. येत्या २४ जून रोजी या मागणीसाठी मुंबईत मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा पुढाकार मसापने घेतला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचा समारोप करताना डॉ. रसाळ बोलत होते. 

कायद्याने पूर्ण प्रश्न सुटणार नाहीत, असा सल्ला देत डॉ. रसाळ यांनी समाजानेच स्वत:हून काही करण्याची गरज असल्याचे सांगितले. प. बंगाल आणि ओडिशामध्ये तेथील भाषा शिकल्याशिवाय तेथे राहताच येत नाही. महाराष्ट्रातही असेच झाले पाहिजे. दुकानदार, भाजीवाले, रिक्षाचालकांशी मराठीत बोला. आपण बोलत नाही. शासकीय, व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर मराठीचा वापर वाढवा, असे आवाहन रसाळ यांनी केले. डॉ. शेख इक्बाल मिन्ने, वीरा राठोड, ऋषिकेश पवार, प्रा. रमेश औताडे, कुंडलिक अतकरे, जगन्नाथ पाटील, शरद देऊळगावकर, प्रा. नवनाथ गोरे आदींनी सूचना केल्या.

भाषाधोरणाचा मसुदा तयार, पण... मराठी भाषा धोरणाचा मसुदा तयार आहे. गेल्या बारा वर्षांपासून यावर काम चालू आहे. देशाचे संविधान लिहायला एवढा वेळ लागला नाही; पण सरकारच्या उदासीनतेमुळे तयार मसुद्याचा कायदा व्हायला वेळ लागत असल्याचे वीरा राठोड यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

पाच जण स्टेजवर, ३२ जण समोरमराठीच्या अस्तित्वासाठी कायद्याच्या मागणीसाठी आंदोलन करावयाच्या आजच्या बैठकीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. व्यासपीठावर मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, डॉ. सुधीर रसाळ आणि रामचंद्र काळुंखे हे सोडले तर समोर रसिक-प्रेक्षक म्हणून ३७ जण उपस्थित होते. या प्रेक्षकांत पाच पत्रकार होते. एवढ्या मोठ्या औरंगाबाद शहरात मराठीसाठी दीड-दोनशे जणही उपस्थित राहू शकत नाहीत, ही मोठी दयनीय परिस्थिती होय. त्यातच पाठीमागून प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे हे उपस्थितांपैकी किती जणांची मुले इंग्रजी शाळेत आहेत ते सांगा, असा मार्मिक सवाल उपस्थित करीत होते. अर्थात त्याचे उत्तर मिळालेच नाही.

टॅग्स :marathiमराठीState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद