शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात करदाते वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:00 IST

नवीन आर्थिक वर्षात मराठवाड्यातून दीड हजार कोटी रुपयांचा आयकर वसूल करण्यात येणार आहे. मागील वर्षभरात सव्वालाख नवीन आयकरदात्यांची संख्या वाढविण्यात विभागाला यश आले असल्याची माहिती मुख्य आयकर आयुक्त असीमकुमार यांनी येथे दिली.

ठळक मुद्देअसीमकुमार : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवीन आर्थिक वर्षात मराठवाड्यातून दीड हजार कोटी रुपयांचा आयकर वसूल करण्यात येणार आहे. मागील वर्षभरात सव्वालाख नवीन आयकरदात्यांची संख्या वाढविण्यात विभागाला यश आले असल्याची माहिती मुख्य आयकर आयुक्त असीमकुमार यांनी येथे दिली.केंद्रीय अर्थसंकल्पानंतर मराठवाड्यातील आयकर विभागाच्या कार्याचा आढावा व अर्थसंकल्पाबाबतची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी असीमकुमार बुधवारी औरंगाबादेत आले होते. मागील दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी नाशिक येथे मुख्य आयकर आयुक्तपदाचे सूत्र स्वीकारले. नाशिक विभाग व मराठवाडा विभाग त्यांच्या कार्यक्षेत्रात आहे. आज सकाळपासूनच छावणीतील आयकर विभागात मॅरेथॉन बैठका सुरूहोत्या. मराठवाड्यातील आयकर विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकांना हजर होते. विभागाचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. असीमकुमार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. जीडीपी वाढतआहे.नवीन आर्थिक वर्षासाठी नाशिक विभाग व औरंगाबाद विभाग मिळून ५८०० कोटींचे आयकर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात औरंगाबाद विभागाला दीड हजार कोटी रुपये आयकरातून वसूल करायचे आहे. यात टीडीएस वसुलीचाही समावेश आहे. मागील आर्थिक वर्षात मराठवाड्यात नवीन सव्वा कोटी आयकरदाते जोडल्या गेले असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव व के.पी.सी.राव यांची उपस्थिती होती.आयकर विभागाचे दरवाजे खुलेप्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी सांगितले की, आयकरसंदर्भात कोणाला काही समस्या असतील तर त्यांच्यासाठी आयकर विभागाचे दरवाजे केव्हाही खुले आहेत. आयकर भरण्यासंदर्भात अडचणी असतील तर थेट आयकर विभागात येऊन शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.देशाच्या उन्नतीसाठी आयकर वेळेवर भरामुख्य आयकर आयुक्त असीमकुमार यांनी आवाहन केले की, देशाच्या उन्नतीसाठी, येथील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करदात्यांनी कर वेळेवर भरणे आवश्यक आहे. तसेच करचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आयकर विभागाच्या अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये करचुकवेगिरी करणारे बरोबर सापडल्या जातो. यामुळे कोणी गाफील राहू नये, असा इशाराही त्यांनी दिला.सेंट्रल अ‍ॅक्शन प्लॅननवीन आर्थिक वर्षात नवीन आयकर करदात्यांची संख्या वाढविणे व आयकराचे दीड हजार कोटींचे नवीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आयकर विभागाच्या वतीने सेंट्रल अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती असीमकुमार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, याअंतर्गत पुढील तीन महिन्यांत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुका पातळीवर अधिकारी जाऊन जनजागृती करणार आहेत. तसेच करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.