बीड : येथील पालिकेकडून कर वसुली करण्यास टाळाटाळ तर होतच आहे, शिवाय कर भरण्यास नागरिकांचीच नव्हे तर शासकीय कार्यालयांची सुद्धा उदासिनता असल्याचे शुक्रवारी हाती लागलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले असून पालिका डबघाईला आली आहे. नागरिकांऐवजी शासकीय कार्यालयांनीच पालिकेचा कर थकविला आहे. कर बुडवेगिरीत जिल्हा परिषदेचा पहिला क्रमांक आहे.बीड शहरात शासकीय कार्यालयांची संख्या शंभरच्या जवळपास आहे. नागरिकांबरोबरच त्यांच्याकडूनही विविध प्रकारचा कर वसूल केला जातो. वृक्षकर, पाणीपट्टी, घरपट्टी, अग्नीकर, शिक्षकफंड, रोजगार हमी कर, मालमत्ता कर आदींचा समावेश आहे. सध्या वर्षाअखेर वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पालिकेतील वसुली विभाग गतिमान झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी कर भरावा, यासाठी त्यांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. एवढे दिवस सुस्त असलेला वसुली विभाग केवळ लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आता कामाला गती देत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.नागरिकांकडेच जास्त कर आहे, असा अंदाज आता चुकीचा ठरत आहे. केवळ नागरिकच नव्हे तर शासकीय कार्यालयेही पालिकेचा कर भरण्यास उदासीन आहेत. प्रत्येकवर्षी या कार्यालयाचा कर अधिकाधिक वाढत चालल्याचे सूत्रांनी सांगितले.केवळ नोटिसा पाठवून बोळवणपालिकेच्या नोटिसांना काही धनदांडगे दाद देत नाहीत. पालिका सामान्यांवरच बडगा उगारते. त्यामुळे प्रत्येक वर्षी कर बुडव्यांना नोटिसा पाठवून पालिका पाठराखण करीत असल्याचा आरोपही मनविसेचे शैलेश जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. (प्रतिनिधी)दहा हजारापेक्षा अधिक कर आहे, अशांना पालिकेकडून जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. ४त्यांची मालमत्ता जप्त होते की केवळ फार्स ठरतो ? हे लवकरच कळेल.
कर थकबाकीत जिल्हा परिषद अव्वल
By admin | Updated: February 10, 2015 00:31 IST