शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तूर तेजीत सोयाबीनचे दर घसरले

By admin | Updated: August 7, 2014 23:30 IST

हिंगोली : उत्पादकांच्या हातातून माल गेल्यानंतर भाववाढीची परंपरा यंदाही कायम राहिली.

हिंगोली : उत्पादकांच्या हातातून माल गेल्यानंतर भाववाढीची परंपरा यंदाही कायम राहिली. तुरीच्या बाबतीत गुरूवारी ही प्रचिती आल्याने क्विंटलामागे ४ हजार ८५० रूपयांचा कमाल भाव गेला; परंतु उत्पादकांपेक्षा व्यापाऱ्यांचाच माल अधिक असल्याने वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. दुसरीकडे सोयाबीनच्या भावात घट पाहवयास मिळाली. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मालाची आवक होते. वार्षिक उलाढालीमुळे पहिल्यापासून बाजार समिती ‘अ’ गटातमध्ये समाविष्ट आहे. हळद आणि सोयाबीनची वर्षभर खरेदी बाजार समितीत सुरू असते; परंतु गतवर्षी उत्पादनात घट झाल्याने प्रतिवर्षीप्रमाणे सोयाबीनची खरेदी-विक्री समितीत झाली नाही. हंगामाप्रमाणे सध्या भावातही घट झाली. बाजारात आवक नसतानाही ४ हजारांवर सोयाबीन घसरले. गुरूवारी सकाळी ३ हजार ४९० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार त्यात वाढ होऊन कमाल दर ३ हजार ८३० वर पोहोचला. मागील पंधरवड्यात ४ हजार ३०० रूपयांपर्यंत सोयाबीनचा दर होता. तुरीची उलट स्थिती झाली असून संपूर्ण हंगामात सव्वाचार हजारांच्यावर न गेलेली तूर पाच हजारांजवळ पोहचली. गुरूवारी पहिल्यांदाच तुरीला ४ हजार ८५० रूपयांचा सर्वोच्च दर मिळाला. प्रारंभी ४ हजार ३१० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. जिल्ह्यात गतवर्षी तुरीचे क्षेत्र केवळ ३२ हजार हेक्टर असल्यामुळे उत्पादन देखील कमी आहे. त्यातच आर्थिक चणचणीपायी लवकर उत्पादकांनी तुरीला बाजार दाखविली. त्यामुळे सध्या बाजार समितीत तुरीचे आवक कमी आहे. येणारी तूर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्याचीच अधिक असल्याने व्यापाऱ्यांचीच चांदी होत आहे. (प्रतिनिधी)