लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत घेतली जाणारी शंका दूर करण्यासाठी वापरण्यात येणाºया व्ही.व्ही. पॅट मशिन अर्थात वोटर व्हेरीफाईड पेपर आॅडीेट ट्रेलचा वापर हा महापालिकेच्या प्रभाग २ मध्ये तरोडा बुु. येथे करण्यात येणार आहे. महापालिकेत गुरुवारी राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठीद्वारे काढण्यात आलेल्या सोडतीत हा निर्णय घेण्यात आला आहे.ईव्हीएम मशिनबाबत वारंवार उपस्थित केली जाणारी शंका दूर करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच नांदेड महापालिकेत व्ही.व्ही. पॅट मशिनचा वापर केला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर २० पैकी एका प्रभागात या मशिनचा वापर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी महापालिकेला परवानगी दिली होती. त्यानंतर व्ही.व्ही. पॅटचा वापर कोणत्या प्रभागात करायचा याबाबत निर्णय घेण्यासाठी तसेच व्ही.व्ही. पॅट मशिनची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यासाठी मनपाच्या स्थायी सभागृहात गुरुवारी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्ही.व्ही. पॅटच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.त्याचवेळी कोणत्या प्रभागात ही मशिन वापरावी याबाबत चिठ्ठीद्वारे एका लहान मुलाच्या हस्ते सोडत काढली. त्यात मनपाच्या तरोडा बु. या प्रभाग २ ची चिठ्ठी निघाली. त्यामुळे या प्रभागात व्ही.व्ही. पॅटचा वापर करण्यात येईल. या बैठकीस दिलीपसिंघ सोडी, अवतारसिंघ पहेरेदार, विजयकुमार कांबळे, नेताजी भोसले, भुजंग पाटील, प्रविण साले, दुष्यंत सोनाळे, गोविंदराव शिंदे नागेलीकर, विक्की वाघमारे, शेख अथर आदींची उपस्थिती होती.व्ही.व्ही. पॅटबाबत मनपा आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संभाजी वाघमारे, संतोष कंदेवार, सुनील महिंद्रकर, ए.पी. त्रिभुवन, सुरेखा स्वामी आदींची उपस्थिती होती.
तरोडा बु.मध्ये होणार व्ही.व्ही. पॅटचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:26 IST