शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

तांदूळवाडीत चार घरे फोडली

By admin | Published: July 07, 2014 11:25 PM

ईट : परंडा तालुक्यातील तांदूळवाडी येथे सोमवारी पहाटे चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला़ एका दुकानासह चार ठिकाणी घरफोड्या करून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़

ईट : परंडा तालुक्यातील तांदूळवाडी येथे सोमवारी पहाटे चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला़ एका दुकानासह चार ठिकाणी घरफोड्या करून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ अनेक ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्नही चोरट्यांनी केला़ दागिन्यांसह रोख रक्कम असा जवळपास २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे़पोलिसांनी सांगितले की, चोरट्यांनी सोमवारी पहाटे तांदूळवाडी येथे पहाटेच्या सुमारास बबन भगवान खरसडे यांचे किराणा दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ गल्ल्यातील रोख ४ हजार रूपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल लंपास केला़ तेथून हे चोरटे अर्चना होगले यांच्या घरात घुसले़ होगले यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र व पेटीतील एक हजार रूपये व मुलांच्या पायातील चांदीच्या पट्ट्या चोरून नेले़ त्यानंतर भगवान धोंडीबा हवालदार यांच्या घरात घुसून खिशातील १५०० रूपये लंपास केले़ त्यानंतर चोरट्यांनी छाया खाडे यांच्या घरात घुसून त्यांच्या गळ्यातील पाच गॅ्रमचे मणीमंगळसूत्र व कानातील झुबे चोरून नेले़ याप्रकरणी बबन खरसडे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द अंबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि बी़जी़माळवदे, पोहेकॉ आऱएस़म्हेत्रे हे करीत आहेत़ दरम्यान, चोरट्यांनी सोमवारी पहाटे एकच धुमाकूळ घातल्याने अख्ख्या गावात दहशत पसरली आहे़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत़ (वार्ताहर)दारूविक्रेत्या सहा जणांविरुध्द कारवाईउस्मानाबाद : जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्या सहा जणाविरूध्द बेंबळी, ढोकी व शहर पोलिसांनी रविवारी कारवाई केली़ या कारवाईत ५५३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ बेंबळी पोलिसांनी मेडसिंगा येथे भारत रामा पडवळ याच्याविरूध्द केलेल्या कारवाईत १००० रूपयांचा, केशेगाव शिवारात मंगल अशोक काळे हिच्याकडून १८१० रूपयांचा, केशेगाव येथील भास्कर दादाराव मस्के याच्याकडून १७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ शहर पोलिसांनी जुनाबसडेपो येथे मिनाबाई दगडू कांबळे याच्याकडून २०० रूपयांचा तर ढोकी पोलिसांनी तेर येथील सुनिल देवराव पवार याच्याकडून ८२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़