शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांच्या तीन आठवडे सुटीच्या पार्श्वभूमीवर बदलीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 11:49 IST

आयुक्तांना पालिकेत बदली होऊन सात महिन्यांचा कालावधी झाला आहे.

ठळक मुद्देनगरविकास खात्याच्या सचिवपदी नियुक्ती होण्याचे संकेत याला प्रशासकीय दुजोरा अद्याप मिळू शकलेला नाही. 

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. नगरविकास खात्याच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती प्रशासकीय वर्तुळात आज दिवसभर होती. याला प्रशासकीय दुजोरा अद्याप मिळू शकलेला नाही. 

पुढच्या आठवड्यात आयुक्त तीन आठवडे रजेवर जाणार आहेत. या काळात त्यांचा पदभार जिल्हाधिकारी किंवा पालिकेतील इतर अधिकाऱ्यांकडे दिला जाईल; परंतु या रजेनंतर आयुक्त पुन्हा पालिकेत येणार नाहीत, त्यांच्या बदलीची ऑर्डरच पालिकेत येईल. अशी कुणकुण प्रशासन तसेच राजकीय वर्तुळाला लागली आहे. 

आयुक्त तीन आठवडे रजेवर जाणार असल्याने सर्वसाधारण सभेच्या तारखा मागे-पुढे करण्याप्रकरणी सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी दुपारी खल सुरू होता. दोन सभा घ्यावयाच्या असल्यामुळे सात दिवसांचे अंतर महत्त्वाचे आहे. आयुक्त रजेवर जाण्यापूर्वीच त्या सभा झाल्यास काही महत्त्वाची प्रकरणे मार्गी लागतील. त्यामुळे सभेच्या तारखा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

आयुक्तांना पालिकेत बदली होऊन सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. कचरा समस्या, पाणीपुरवठा, १०० कोटी रस्त्यांची निविदा, ९० कोटींची कचरा प्रक्रिया यंत्रणा खरेदी करणे, शहर बससेवा सुरू करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय या काळात झाले असले, तरी पूर्ण क्षमतेने ते मार्गी लागलेले नाहीत. आयुक्तांची बदली झाली तर येणाऱ्या आयुक्तांना पुन्हा या सगळ्या बाबी नव्याने समजून घेऊन काम करावे लागेल. 

१८ जानेवारीपासून परदेश दौऱ्यावरपंधरा दिवसांच्या रजेवरून परतलेले आयुक्त १८ जानेवारीपासून परदेश दौऱ्यावर जात आहेत. तीन आठवड्यांच्या काळात ते कॅलिफोर्निया येथे स्वस्त घरकुल योजनेचा अभ्यास करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कचरा प्रश्नावर उपाय काढण्यासाठी मे महिन्यात निपुण यांची मनपा आयुक्तपदी बदली केली. दरम्यान, डॉ. निपुण यांना पदोन्नतीही मिळाली. त्यामुळे त्यांची मंत्रालयात नगरविकास खात्यात सचिव म्हणून बदली होण्याची चर्चा आहे. आयुक्त २५ डिसेंबरपासून दहा दिवसांच्या रजेवर होते, त्यात रजेतच त्यांनी रजा वाढवून घेतल्यानंतर गुरुवार, १० जानेवारी रोजी ते मनपात आले. आता पुन्हा ते १८ जानेवारीपासून ते ४ फेबु्रवारीपर्यंत कॅलिफोर्नियाच्या सरकारी दौऱ्यावर जात आहेत. 

टॅग्स :Municipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTransferबदलीState Governmentराज्य सरकार