शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

पैसे फेका, पास मिळवा

By admin | Updated: September 19, 2014 01:01 IST

सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड आपण अपंग आहोत, आम्हाला बसच्या प्रवासभाड्यात ७५ टक्के सवलत आहे, असा गाजावाजा करीत बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर अनेकजण आजही

बोगस पास मिळवून देणाऱ्यांचे रॅकेटसोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीडआपण अपंग आहोत, आम्हाला बसच्या प्रवासभाड्यात ७५ टक्के सवलत आहे, असा गाजावाजा करीत बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर अनेकजण आजही शासनाला चुना लावण्याचे काम करीत आहेत. यावर कारवाया करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने आणखीनच अभय मिळत आहे. लोकमत प्रतिनिधीने मिळविलेल्या बनावट पासवर गुरूवारी प्रवास केला़ असा प्रवास अनेक जण करीत असून, एसटीला हजारोंचा चुना लागत आहे़ बहूजन हिताय, बहूजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी आजही लालपरी दिवस रात्र धावत आहे. सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी, अपंग, महिला, पुरूष, नोकरदार, लोक प्रतिनिधी यांना प्रवास भाड्यात सवलत देत आरक्षित जागा बसमध्ये देण्यात आलेली आहे. महामंडळाच्या बसमध्ये अपंग प्रवाशांसाठी प्रवास भाड्यामध्ये ७५ टक्के सवलत आहे. जे खरोखरच अपंग आहेत, त्यांना हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रूग्णालयापासून ते आगारप्रमुखांच्या कार्यालयापर्यंत उंबरे झिझवावे लागतात. आणि जे लोक अपंग नाहीत अशा लोकांनी ३०० ते ५०० रूपये दिले की, त्यांच्या हातात हे प्रमाणपत्र आणून दिले जाते़अपवादात्मक कर्मचारी तत्परगुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास बीड आगारातील विनाथांबा औरंगाबाद बसचे तिकीट घेतले. मात्र महामंडळातील काही वाहक प्रामाणिक असून येथील के.एम.क्षीरसागर नावाच्या वाहकाने हे प्रमाणपत्र जप्त करून आगारप्रमुख ए.एस.भूसारी व वरीष्ठ लिपीक आर.एन.राठोड यांच्याकडे दिले. यावरून काही कर्मचारी आजही तत्पर असल्याचे दिसून आले.सहकार्याचाही अभावबनावट पास जप्त करून संबंधीत प्रवाशावर वाहक हा जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास जातो. मात्र पोलिसही याकडे दुर्लक्ष करतात व आरोपीची बाजू घेत आपले हितसंबंधी जोपासत असल्याचे एका वाहकाने ‘लोकमत’ला सांगितले.कारवाया गुंतागुंतीच्या ‘आॅन द वे’ बनावट अपंगत्वाचे पासधारक वाहकांच्या निदर्शनास आले तरी यासंबंधी कारवाईची ‘प्रोसेस’ गुंतागुंतीची असल्याने याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कारवाया दरम्यान बनावट पास जप्त केला जातो. पोलीस केस दाखल झाल्यानंतर न्यायालयात प्रकरण जाते. हे प्रकरण लवकर निकाली लागत नसून यामध्ये वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या ‘राड्या’त कोणीही पडत नसल्याचे समोर आले.कारवाईचा बोजवाराअपंगात्वाच्या बनावट सवलत पासचा सर्रास वापर केला जातो. मात्र त्यांच्यावरील कारवाया या दुर्मीळच असल्याचे सांगण्यात आले. यामुळेच दिवसेंदिवस कारवायाची चिंता न करता अपंगत्वाच्या बनावट सवलतींवर प्रवास करणाऱ्यांमध्ये वाढ होत आहे.लोकमत प्रतिनिधीने एक एजंट गाठला़४तो बनावट पास मिळवून देत असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला पैशाचे अमिष दाखवले़४अवघ्या ३०० रूपयांमध्ये त्याने चार दिवसात पास हातात ठेवला़४या पाससाठी त्याने कुठलेही कागदपत्रांची मागणी केली नाही़ घेतला फक्त एक फोटो़४जिल्हा समाज कल्याण अधिकारी, आगार व्यवस्थापक यांच्या स्वाक्षऱ्या व शिक्के असलेला पास त्याने मिळवून दिला़अपंगत्वाचे बोगस पास मिळवून देणाऱ्याचे मोठे रॅकेट असून याला जिल्हा परीषद, समाजकल्याण आणि राज्य परीवहन महामंडळातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गल्लीबोळात क्षुल्लक रक्कम घेऊन बनावट बसची सवलत पास घरपोच आणून दिली जाते. ही पास मिळवण्यासाठी ‘वशिला’ लागत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. कारवाया थंडावल्याने दलाल मोकाट आहेत़