शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
3
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
4
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
5
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
6
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
7
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
8
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
9
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
10
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
11
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
12
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
13
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
14
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
15
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
16
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
17
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
18
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
19
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
20
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?

साठेबाजांवर कारवाई करा

By admin | Updated: May 25, 2016 00:02 IST

औरंगाबाद : विभागातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघत आहे. या परिस्थितीत त्याची अजिबात लूट होता कामा नये. म्हणून पुरेसी काळजी घ्या

औरंगाबाद : विभागातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघत आहे. या परिस्थितीत त्याची अजिबात लूट होता कामा नये. म्हणून पुरेसी काळजी घ्या, खते-बियाणांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी आज येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. एखादा अधिकारी कुणाला पाठीशी घालत असेल तर त्यालाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी मराठवाडा विभागाची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी बियाणे आणि खतांची मागणी, उपलब्धता, भरारी पथकांची कारवाई आदींचा जिल्हावार आढावा घेतला. काही जिल्ह्यांचा आढावा सुरू असताना त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. शिवाय नियोजनाचा अभावही दिसून आला. या कारणावरून देशमुख यांनी अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले की, खरीप हंगामाच्या दृष्टीने मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वच जिल्ह्यांत खते आणि बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. कुठेही बियाणे किंवा खतांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. सोयाबीनच्या बियाणाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्याकडील सोयाबीनचीच पेरणी करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊन पिकांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यादृष्टीनेही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. यंदा पुरेसा पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. तरीदेखील खबरदारी म्हणून आपत्कालीन नियोजन केले आहे. पावसाचा खंड पडला तर काय करावे, दुबार पेरणीची गरज भासली तर कोणत्या गोष्टी करायच्या याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्हानिहाय आराखडे तयार केले आहेत, असेही देशमुख म्हणाले. बैठकीला औरंगाबाद प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी भीमराव कुलकर्णी यांच्यासह आठही जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदांचे जिल्हा कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक आदी अधिकारी हजर होते.