जालना: शहरासह जिल्ह्यात सायंकाळी पावणेसहा वाजता वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात घरांची पडझड, वाहने व पिकांचे मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जालना शहर रात्रभर अंधारात होते. दुपारपासून काही ठिकाणी हलका पाऊस पडला. सायंकाळी वादळाच्या प्रचंड वेगात पाऊस सुरु झाला. जालना शहरासह तालुक्यातील अनेक गावांना या पावसाचा तडाखा बसला. भोकरदन, अंबड व बदनापूर तालुक्यात हलका पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. दुपारच्या कडक उन्हानंतर सायंकाळी जोरदार पाऊस पडल्याने पुन्हा उकाड्यात मोठी वाढ झाली. वारे आणि पाऊस असल्याने रस्त्यावरील वाहतूकही मंदावली होती. झोपडपट्टी भागात अनेक घरावरील पत्रे तसेच विजेच्या खांबाचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही उन्मळून पडल्या. वीजपुरवठाही खंडित झाला होता. नुकसानीची माहिती हाती आली नसली तरी अनेक घरांवरील पत्रे उडाली. जालना तालुक्यातील गोलापांगरी, बठाण, इंदेवाडी, अंतरवाला, सामनगाव, रामनगरसह बाजी उम्रद, जळगाव, सावरगाव, हडप, भाटेपुरी, हातवन, खनेपुरींसह अनेक गावांत वादळी पावसाने हजेरी लावली. भोकरदन तालुक्यातील लेहा, शेलूद येथे पाऊस झाला. अंबड व बदनापूर तालुक्यातही पाऊस झाला. वाटुर परिसरात गारपीटवाटुर: परतूर तालुक्यातील वाटुर परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. गुरूवारी रात्रीही या परिसरात पाऊस झाला होता.त्यामुळे कांदा, आंबा, मोसंबी बांगाचे मोठे नुकसान झाले.वाटुर परिसरात गुरूवारी रात्री तसेच शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान झाले. कडबा पूर्ण भीजला.सेवलीत पाऊससेवली- जालना तालुक्यातील सेवली येथे शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे आंबा व फळबांगाचे मोठे नुकसान झाले.हसनाबादेत पाऊसहसनाबाद- भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरात शुक्रवारी सायंकाळी वाळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले.घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली, कुंभारपिंपळगावसह परिसरातील अनेक गावांत वादळी पावसाने दाणादाण उडाली. जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी, भारज, वरुड तसेच भोकरदन तालुक्यातील राजूर, केदारखेडा येथे तुफान पाऊस झाला.(प्रतिनिधी)
अवकाळीच्या तडाख्याने जिल्ह्यात दाणादाण
By admin | Updated: April 11, 2015 00:19 IST