शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

डावपेच, कुरघोडी अन् गोंधळ...!

By admin | Updated: January 10, 2017 23:54 IST

बीड : येथील पालिकेत मंगळवारी बोलाविलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत काका-पुतण्यांमधील वर्चस्वाची लढाई दिसून आली.

बीड : येथील पालिकेत मंगळवारी बोलाविलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत काका-पुतण्यांमधील वर्चस्वाची लढाई दिसून आली. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर पालिकेत येण्यापूर्वीच आजारी पडले. त्यानंतर जि.प. सभापती संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सभा होण्यासाठी तोडगा काढण्याची विनंती केली. तिकडे एमआयएमने जारी केलेला व्हिप स्वतंत्र गटाच्या सात नगरसेवकांनी नाकारला. पेचप्रसंग निर्माण झाल्याने प्रशाासनाने चेंडू नगरविकास विभागाच्या कोर्टात ढकलला. डावपेच, कुरघोडी व गोंधळात सर्वसाधारण सभा अखेर झालीच नाही.थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बाजी मारली. त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना विकास आघाडीचे सर्वाधिक २० नगरसेवक पालिकेत निवडून आले. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी अपेक्षित संख्याबळ नसल्याने त्यांनी एमआयएमच्या ७ सदस्यांच्या स्वतंत्र गटाची मदत घेतली. मंगळवारी उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सव्वाबारा वाजता पालिका सभागृहात बैठक बोलावली होती. त्यासाठी सर्वच पक्ष व आघाडीचे नगरसेवक पालिकेत दाखल झाले. मात्र, सव्वाअकरा वाजताच डॉ. क्षीरसागर यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना शहरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. ही वार्ता सोशल मीडियावरून सर्वत्र पसरली. त्यानंतर पालिका व दवाखान्यात कार्यकर्त्यांची गर्दी झाली. दरम्यान, नगराध्यक्ष हे पीठासीन अधिकारी असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सभा घेणे बेकायदेशीर ठरते. त्यामुळे मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर यांच्यासमोर पेच निर्माण झाला. त्यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली. इकडे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांच्या प्रतीक्षेत सभागृहात बसून होते. काही वेळानंतर डॉ. क्षीरसागर यांना अधिक उपचारासाठी औरंगाबादला हलविल्याचे वृत्त धडकले. त्यानंतर बैठक होणार नाही, असे चित्र निर्माण झाले. जि.प. सभापती संदीप क्षीरसागर हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. मात्र, नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत बैठक घेणे उचित होणार नाही, असा निर्वाळा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. शेवटी निवडणूक विभागातील प्रशासन प्रमुख सतीश शिवणीकर यांनी सभागृहात जाऊन सभा होणार नसल्याचे घोषित केले. त्यानंतर ताटकळलेल्या नगरसेवकांनी सभागृह सोडले. (प्रतिनिधी)संदीप क्षीरसागर यांच्यावर गुन्हा४दुपारी विविध पक्षांच्या नगरसेवकांचे जथ्थे पालिकेकडे जात होते. एमआयएमचे नगरसेवक शेख अमर शेख जैनोद्दीन व नगरसेविका रुक्सानाबी जकियोद्दीन हे दोघे जीप (क्र. एमएच-२३ क्यू-१३१३) मधून पालिकेकडे येते होते.४जि.प.च्या बांधकाम विभागासमोरुन सभापती संदीप क्षीरसागर व काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांचा ताफा देखील पालिकेकडे जाण्यास निघाला होता. शेख अमर यांचा जीपचालक शेख इरफान यांनी गाडी थांबवली. ४त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या ताफ्यातील गाड्याही थांबल्या. यावेळी संदीप क्षीरसागर व शेख बिलाल यांनी चालक शेख इरफान याच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे गोंधळ उडून तणावपूर्ण स्थिती बनली.४शेख अमर यांनी शहर ठाण्यात संदीप क्षीरसागर, शेख बिलाल, शेख सिद्दीक या तिघांवरुद्ध दिलेल्या तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली.